हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब लाखो जनतेसाठी आजही प्रेरणादायी : पंतप्रधान

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-Jan-2020
Total Views |


balasaheb _1  H



नवी दिल्ली : हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांची आज ९४ वी जयंती आहे. यानिमित्त शिवाजी पार्क येथील बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळावर सकाळपासूनच सर्व पक्षीय नेत्यांची अभिवादन करण्यासाठी शिवाजी पार्ककडे गर्दी आहे. तसेच देशभरातील दिग्गज नेत्यांकडूनही बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करण्यात येत आहे. 'हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे हे लाखो जनतेसाठी आजही प्रेरणादायी आहेत', असे ट्विट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन केले.





ते म्हणतात,"महान बाळासाहेब ठाकरे यांना त्यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन. धैर्यवान बाळासाहेबांनी लोककल्याणाचे प्रश्न उपस्थित करण्यास कधीही मागेपुढे पाहिले नाही. त्यांना नेहमीच भारतीय नीतिनियम आणि मूल्ये यांचा अभिमान होता. ते लाखो जनतेसाठी आजही प्रेरणादायी आहे." असे म्हणत त्यांनी बाळासाहेबांना अभिवादन केले. त्याचबरोबर विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनीही बाळासाहेबांना अभिवादन केले.

 





विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट केले कि, कठोर अन् प्रेमळ...प्रेरणादायी अन् उर्जावान... हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे विचार सदैव मार्गदर्शन करीत राहतील. महाराष्ट्राचं वैभव असणारे, ज्वलंत विचारांचा मार्मिकठेवा हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन...!

 


@@AUTHORINFO_V1@@