अजब गजब... ट्रम्प म्हणतात अमेरिकाही विकसनशील देश?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-Jan-2020
Total Views |


saf_1  H x W: 0


नवी दिल्ली : आर्थिक महासत्ता असलेल्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका वक्तव्याने जगभर खळबळ माजवली आहे. अमेरिका हा विकसनशील देश असल्याच्या अजब गजब दावा त्यांनी केला आहे. जागतिक व्यापार संघटना (डब्ल्यूटीओ) अमेरिकेला योग्य वागणूक देत नाही, असा आरोप ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये पत्रकारांशी बोलताना केला.

 

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, "डब्ल्यूटीओ ही अमेरिकेचा विकसनशील म्हणून विचार करत नाही. दुसरीकडे डब्ल्यूटीओ ही चीन आणि भारताचा विकसनशील म्हणून विचार करते. पुढे ते म्हणाले, डब्ल्यूटीओबाबत माझे काही मतभेद असल्याचे तुम्हाला माहीत आहे. कारण अमेरिकेला योग्य वागणूक दिली जात नाही, असे ट्रम्प म्हणाले.

 

"भारत-चीनला विकसनशील देश म्हणून प्रचंड फायदे मिळतात. तसे फायदे आम्हाला मिळत नाही. त्यांनाही फायदे मिळू नयेत. जर त्यांना फायदे मिळत असतील, तर आम्हालाही फायदे मिळावेत. आम्ही संपूर्ण नवीन कराराबाबत बोलत आहोत. " अमेरिकेत अध्यक्षपदाच्या निवडणुका आहेत. त्या पार्श्वभूमीवर बोलताना ट्रम्प सरकारने ७० लाख नवे रोजगार निर्माण केल्याचे त्यांनी सांगितले. गेल्या ५० वर्षात अमेरिकेत बेरोजगारीचे सर्वात कमी प्रमाण झाल्याचाही त्यांनी दावा केला.

 
@@AUTHORINFO_V1@@