राजधानीत घुमणार स्वातंत्र्यवीर सावरकरांचा जयघोष

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Jan-2020
Total Views |
Veer Savarkar _1 &nb



दिल्लीत अखिल भारतीय स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य संमेलन


नवी दिल्ली : 'सावरकर दर्शन प्रतिष्ठान' आयोजित अखिल भारतीय स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य संमेलनाला नवी दिल्लीतील डॉ. आंबेडकर इंटरनॅशनल सेंटर, १५ जनपथ येथे २६ फेब्रुवारी रोजी सुरुवात होणार आहे. दोन दिवस सुरू असणाऱ्या या संमेलनाचा समारोप २७ फेब्रुवारी रोजी होणार आहे. या संमेलनात सहभागी होण्यासाठी १५ फेब्रुवारी २०२० ही अंतिम मुदत आहे. नाव नोंदणीसाठी 8108024609 (मुंबई), 870079936 (दिल्ली) या क्रमांकांवर संपर्क करण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

सावरकरप्रेमींना या संमेलनात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर प्रकाशित झालेले साहित्य, ग्रंथ आणि यासोबत विविध प्रकारची पुस्तके उपलब्ध होणार आहेत. संमेलनात सहभागी होणाऱ्यांसाठी राहण्याची आणि भोजनाची व्यवस्था आयोजकांकडून केली जाणार आहे.


 
@@AUTHORINFO_V1@@