सरकारचे वरातीमागून घोडे यूपी, हरियाणानंतर महाराष्ट्रात 'तान्हाजी' करमुक्त

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Jan-2020
Total Views |

TANHAJI _1  H x



मुंबई : बॉलिवूड सिनेसृष्टीतील अभिनेता अजय देवगणचा 'तान्हाजीः द अनसंग वॉरिअर' सिनेमाला करमुक्त घोषित करण्याचा निर्णय बुधवारी राज्य सरकारने जाहीर केला. सरकारच्या या निर्णयानंतर तान्हाजी हा सिनेमा आता उत्तर प्रदेश आणि हरियाणानंतर राज्यातही करमुक्त असणार आहे. सरकारच्या या निर्णयावर मात्र सिनेरसिकांनी टीका केली आहे. मराठमोळ्या योध्याच्या शौर्याची कहाणी सांगणारा हा सिनेमा सर्वात आधी महाराष्ट्रात करमुक्त होणे गरजेचे होते. मात्र इतर राज्यांनी हा निर्णय आधी घेतला. त्यामुळे सरकारचा हा निर्णय म्हणजे वरातीमागून घोडे असल्याची टीका अनेक सिनेरसिकांनी केली.

 

१० जानेवारीला हा सिनेमा देशभरात प्रदर्शित झाला होता. १३० कोटींच्या बजेटच्या या सिनेमाने आतापर्यंत १८० कोटींहून अधिकची कमाई केली आहे. अभिनेता अजय देवगणच्या करिअरमधील हा १०० वा सिनेमा आहे. याशिवाय अजयचा हा दुसरा सिनेमा आहे जो २०० कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश करेल. याआधी रोहित शेट्टी दिग्दर्शित 'गोलमाल अगेन' या सिनेमाने २०० कोटींहून अधिकचा गल्ला कमावला होता. सिनेव्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी सिनेमाच्या कलेक्शनची अधिक माहिती दिली.

 

सर्व मंत्रिमंडळासोबत चित्रपट पाहणार

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे प्लाझा थीएटरमध्ये हा चित्रपट पाहणार असल्याचे सांगण्यात येत होते. मात्र ऐनवेळी मुख्यमंत्र्यांनी हा चित्रपट आजच्याऐवजी नंतर पाहण्याचा निर्णय घेतला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मुंबई महानगरपालिका निर्मित 'वाइल्ड मुंबई' चित्रफितीचा शुभारंभ करण्यात आला. मुख्यमंत्र्यांनी आपण 'तान्हाजी' चित्रपट आज पाहणार नाही, असे स्पष्ट केले. आज मी अजय देवगणसोबत तान्हाजी चित्रपट पाहणार, अशा बातम्या आल्या होत्या मात्र, मी आज नाही तर नंतर माझ्या संपूर्ण मंत्रिमंडळासोबत हा चित्रपट नक्की पाहणार आहे, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.



@@AUTHORINFO_V1@@