भारतीय संघाचा दिलदारपणा... पराभूत संघासोबत काढला फोटो

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Jan-2020
Total Views |


safs_1  H x W:


नवी दिल्ली : स्पर्धा म्हंटले की भांडणे आली, स्वाभिमान आले. परंतु भारतीय संघाच्या एका कामगिरीने त्यांच्या खिलाडूवृत्तीने एक उत्तम उदाहरण जगासमोर ठेवले आहे. आयसीसी १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषकातील एका सामन्यामध्ये भारताने जपान या संघाचा दारुण पराभव केला. क्रिकेटमध्ये नवखा असलेल्या जपानच्या संघाबरोबर भारतीय संघाने सोबत फोटो काढून खूप मोठी खिलाडूवृत्ती दाखवली. याचे जगभरामध्ये कौतुक होत आहे.

 

१९ वर्षाखालील एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाने अवघ्या २९ चेंडूत विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना जपानचा संघ अवघ्या ४१ धावांमध्ये सर्वबाद झाला होता. त्यानंतर ४२ धावांचे आव्हान भारताच्या सलामीवीरांनी अगदी सहज पार केले. जपानच्या फलंदाजांचा भारतीय गोलंदाजांनी अक्षरश: धुव्वा उडवला. या सामन्यानंतर भारतीय संघाला विजयी फोटो काढण्यास सांगितले होते. सहसा विजयी संघ या विजयी फोटो काढून मोकळे होतात. पण, भारताचा कर्णधार प्रियम गर्ग याने या फोटोमध्ये नव्याने समाविष्ट झालेल्या जपानच्या संघालाही बोलावले आणि त्यांच्यासोबत फोटो काढला. त्याच्या या खिलाडूवृत्तीने सर्व खेळाडूंसमोर एक वेगळा आदर्श ठेवला आहे.

@@AUTHORINFO_V1@@