मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Jan-2020
Total Views |


train_1  H x W:


मुंबई : मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. डोंबिवली-ठाकुर्ली स्थानकांदरम्यान एक्स्प्रेसचे इंजिन बंद पडल्याने मध्य रेल्वेच्या वाहतुकीवर परिणाम झाला आहे. पाटणा एक्स्प्रेसचे इंजिन बंद पडले  असून यामुळे जलद मार्गावरील वाहतूक धीम्या मार्गावर वळवण्यात आली आहे. कल्याणहून मुंबईकडे येणारी वाहतूक धीम्या मार्गावर वळवण्यात आली आहे. यामुळे अनेक प्रवासी स्थानकांवर प्रवाशांची गर्दी झाली आहे.


जलद मार्गावर राजेंद्र नगर- पाटणा एक्स्प्रेस बंद पडल्याने कल्याणकडून मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनेसकडे जाणाऱ्या जलद मार्गावरील लोकल गाड्या खोळंबल्या आहेत. बंद पडलेल्या इंजिनाती दुरुस्ती करण्यासाठी किंवा एक्स्प्रेसला नवे इंजिन जोडण्यासाठी कमीत कमी अर्धा ते पाऊण तासाचा कालावधी आवश्यक असल्याचे सांगितले जात आहे. जलद मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प होऊ नयेत यासाठी जलद मार्गावरील सर्व गाड्या धीम्या मार्गावर वळवण्यात आल्या आहेत. यामुळे धीम्या मार्गावरील लोकलचे वेळापत्रकही कोलमडले आहे. या मुळे मध्य रेल्वेच्या स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी उसळली आहे.

@@AUTHORINFO_V1@@