"कुठल्याही परिस्थितीत 'नागरिकत्व' कायदा मागे घेणार नाही"

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Jan-2020
Total Views |

Amit Shah _1  H

 

नवी दिल्ली : 'नागरिकत्व दुरुस्ती विधेयक हे नागरिकत्व देणारे विधेयक आहे, याविधेयकामुळे कुणाचेही नागरिकत्व जाणारे नाही. त्यामुळे कितीही विरोध झाला तरीही हा कायदा मागे घेतला जाणार नाही', असे स्पष्टीकरण केंद्रीयमंत्री अमित शाह यांनी दिले. नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाच्या समर्थनात लखनऊ येथे झालेल्या सभेत ते बोलत होते.






'समाजवादी पक्ष, बहुजन समाज पक्ष आणि तृणमुल काँग्रेसतर्फे केल्या जाणाऱ्या विरोधाचाही त्यांनी समाचार केला. आंदोलनादरम्यान होणाऱ्या हिंसाचाराला सर्वस्वी विरोधी पक्षच जबाबदार आहेत. कुठेही कायद्यात अधिकार हिरावून घेण्याचा उल्लेख नसतानाही लोकांची माथी भडकवून हिंसाचार घडवला जात आहे. राहुल गांधी, ममता दीदी आणि अखिलेश यादव यांनी आमच्याशी चर्चा करावी,' असे खुले आव्हान त्यांनी यावेळी दिले.

@@AUTHORINFO_V1@@