दोन शिक्षकांचा विद्यार्थीनीवर बलात्कार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Jan-2020
Total Views |

nbanded_1  H x


 

नांदेडमधील घटना : दोन महिन्यांनी प्रकरण पोलीसांत


नांदेड : शिक्षक-विद्यार्थ्यांच्या नात्याला काळीमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. दोन शिक्षकांनी विद्यार्थीनीवर लैगिंक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. ही घटना रामतीर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. विशेष म्हणजे या प्रकाराला दोन महिने उलटले आहेत. संबंधित पीडितेची प्रकृती गंभीर झाल्यानंतर पोलीसांनी या प्रकरणाची दखल घेत गुन्हा दाखल केला आहे.

 

शंकरनगर येथील एका नामांकीत शाळेत हा प्रकार घडला आहे. पीडित विद्यार्थींनीवर आरोपी रसुल सय्यद आणि दयानंद राजुळे या दोघांनी पीडितेला एका कार्यक्रमाचा व्हीडिओ दाखवतो, असे सांगत एका खोलीत नेले. मोबाईलमध्ये अश्लील चित्रफीत दाखवून त्यांनी तिच्यावर अतिप्रसंग केला. या प्रकरणी पीडितेच्या आईने शाळा प्रशासनाकडे तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्यांच्यावर दबाव टाकून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करण्यात आला. बदनामीच्या भीतीने पीडितेच्या आईने गप्प राहण्याचा प्रयत्न केला.

 

गेल्या काही दिवसांपासून पीडितेवर रुग्णालयात उपचार सुरू होते. तिची प्रकृती गंभीर होत चालली होती. या प्रकरणी ग्रामस्थ आणि सामाजिक संघटनांना समजल्यानंतर याविरोधात आवाज उठवण्यात आला आहे. स्थानिक पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.



@@AUTHORINFO_V1@@