जगत प्रकाश नड्डा भाजपचे ११वे राष्ट्रीय अध्यक्ष

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Jan-2020
Total Views |
J P Nadda _1  H


भाजप राष्ट्रीय अध्यक्षांची एकमताने निवड


नवी दिल्ली : भाजप अध्यक्ष अमित शाह यांचा कार्यकाळ समाप्त झाल्यानंतर पक्षाला नव्या अध्यक्षपदाच्या नियुक्तीसाठी सोमवार, दि. २० जानेवारी रोजी सभा बोलावण्यात आली होती. या सभेत एकमताने जगत प्रकाश नड्डा (जे. पी. नड्डा) यांच्या नावावर एकमताने शिक्कामोर्तब करण्यात आला. यापूर्वी जे.पी. नड्डा यांच्यावर राष्ट्रीय कार्यकारणी अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती.

 

सकाळी १० वाजल्यापासून सभेला सुरुवात झाली. १२.३० वाजता अर्जांची छाननी केली जाणार होती. दुपारी दीड वाजेपर्यंत अर्ज मागे घेण्याची वेळ होती. तसेच निवडणूक प्रक्रीया झाल्यास मतदानही याच वेळात पार पडणार होते. सकाळी ११ वाजता जे.पी. नड्डा पत्नीसह भाजप मुख्यालयाकडे रवाना झाले. भाजप मुख्यालयात अध्यक्ष अमित शाह, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राजनाथ सिंह आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.

 

राजनाथ सिंह म्हणाले, "नड्डा यांच्याकडे संघटनात्मक कौशल्य आहे. सर्वांना सोबत घेऊन जाण्याची क्षमता आहे. कित्येक वर्षांपासून ते पक्ष संघटनेत कार्यरत आहेत. त्यांच्या कार्यकाळात पक्ष विस्तार आणखी होईल, असा मला विश्वास आहे."

 








@@AUTHORINFO_V1@@