संवेदनशीलता भाग-१०

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Jan-2020
Total Views |


saf_1  H x W: 0


शरीराची एक नैसर्गिक ठेवण असते. या ठेवणीत नैसर्गिकरित्याच प्रतिकारशक्ती कार्यरत असते. बाहेरून होणाऱ्या जंतुसंसर्गाला अनुसरून प्रत्येक शरीर त्यानुसार योग्य ते बदल घडवून आणते. त्या जंतूंना परतवून लावण्यासाठी नैसर्गिक सैनिक निर्माण करते.


माणसांची वा प्राण्यांची रोगप्रतिकारकशक्ती त्यांच्या संवेदनशीलतेवर अवलंबून असते. याविषयी केलेल्या संशोधनात असे अनुमान काढण्यात आले की, शरीरातील खरी 'संवेदनशीलता' ही बाहेरून टोचल्या गेलेल्या लसींमुळे प्रभावित होते व कमकुवतही होते. 'संवेदनशीलते'ची स्वत:ची अशी एक लय असते. ही लय या कृत्रिम लसींमुळे बिघडून जाते व बाहेरील बदलांना शरीराने दिलेलाप्रतिसाद बिघडून जातो. अशा बदलांमुळे व स्वत:ची लय बिघडल्यामुळे ही 'संवदेनशीलता' अतिप्रमाणात वाढते किंवा खालावते. या दोन्हींमुळे मग रोगप्रतिकारकशक्ती मंदावते. परिणामी, बाहेरील रोग शरीरात प्रवेश करतात. माणसाची कुठल्याही प्रेरणेला योग्य प्रकारे प्रतिसाद देण्याची जी क्रिया असते, त्यातच बिघाड होतो. पर्यायाने जुनाट आजारांची सुरुवात शरीरात होऊ लागते. याचे अजून एक उदाहरण म्हणजे हल्ली उठसूठ लहानसहान आजारांमध्ये प्रतिजैविकांचा भडिमार करण्यात येतो. ही 'प्रतिजैविके' (अ‍ॅण्टिबायोटिक्स) जंतुसंसर्ग कमी करण्यासाठी दिली जात असतात. या ठिकाणी एक फार महत्त्वाचा मुद्दा जाणून घेणे अत्यंत गरजेचे असते.

 

शरीराची एक नैसर्गिक ठेवण असते. या ठेवणीत नैसर्गिकरित्याच प्रतिकारशक्ती कार्यरत असते. बाहेरून होणाऱ्या जंतुसंसर्गाला अनुसरून प्रत्येक शरीर त्यानुसार योग्य ते बदल घडवून आणते. त्या जंतूंना परतवून लावण्यासाठी नैसर्गिक सैनिक निर्माण करते. त्यालाच 'अ‍ॅण्टिबॉडिज' असे म्हणतात. या 'अ‍ॅण्टिबॉडिज' झालेल्या जंतुसंसर्गासाठी खास करून शरीराने बनविलेल्या असतात. अशाप्रकारे 'नॉर्मल' संवेदनशीलता कार्य करून माणसाला व प्राण्याला रोगमुक्त करण्यास मदत करते. परंतु, जेव्हा जंतुसंसर्ग झाल्यावर लगेच 'प्रतिजैविके' (अ‍ॅण्टिबायोटिक्स) दिली जातात, त्यावेळी ही शरीराच्या नैसर्गिक प्रतिकारशक्ती व संवेदनशीलतेला घातक असतात. कारण, या औषधांनी जंतुसंसर्ग आटोक्यात आणण्याचे कार्य कृत्रिमपणे केले जाते. त्यामुळे असे होते की, शरीराला शरीरात झालेल्या जंतुसंसर्गाचा प्रकार लक्षात यायला वावच दिला जात नाही. शरीरातील नैसर्गिक संवेदनशीलता व प्रतिकारशक्ती प्रथम या जंतुसंसर्गाला ओळखते व त्यानुसार नैसर्गिक बदल घडवून हा संसर्ग परतावून लावते. परंतु, 'अ‍ॅण्टिबायोटिक्स'मुळे शरीरात असे नैसर्गिक बदल घडून येतच नाहीत. परिणामी, शरीराची रोगप्रतिकारशक्ती कार्यरतच नाही. यामुळे असे होते की, शरीरामधील पेशींमध्ये या संसर्गाबद्दल माहिती साठवली जात नाही व शरीर या प्रकारच्या संसर्गाला तोंड देण्यास असमर्थ ठरते. याचाच अर्थ कमकुवत झालेल्या संवेदनशीलता व प्रतिकारशक्तीमुळे मग माणूस इतर कुठल्याही जंतुसंसर्गाला सहज बळी पडतो व पुन्हा पुन्हा तोच संसर्गही रुग्णाला होऊ शकतो. होमियोपॅथीच्या औषधांनी ही प्रतिकारशक्ती व संवेदनशीलता पुन्हा पूर्ववत होऊ शकते. होमियोपॅथीची औषधे ही नैसर्गिक व रुग्णाच्या प्रकृतीला सम असल्यामुळे शरीरात 'नैसर्गिक सैनिक' (अ‍ॅण्टिबॉडिज) निर्माण करण्यास पोषक असे वातावरण निर्माण करतात व पर्यायाने शरीरातील नैसर्गिकशक्ती वाढीस लागून माणूस निरोगी होतो. (क्रमश:)

 

- डॉ. मंदार पाटकर

@@AUTHORINFO_V1@@