खाजगी शाळांमधूनही भगवद्‌गीता शिकवा : गिरीराज सिंह

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Jan-2020
Total Views |


rajnath _1  H x


बेगुसराय : हिंदू संस्कृतीचे पारंपरिक संस्कार व मूल्ये रुजविण्यासाठी मुलांना खाजगी शाळांमध्येही भगवद्‌गीतेचे अध्याय शिकविले गेले पाहिजे असे वक्तव्य केंद्रीय मंत्री आणि बिहारचे बेगूसरायचे खासदार गिरीराज सिंह यांनी केले.

ते म्हणाले कि, 'खासगी शाळांमध्ये मुलांना गीतेतील श्लोक शिकवण्याची आवश्यकता आहे. तसेच शाळेत मंदिरेही बांधली पाहिजेत. याचे कारण म्हणजे मिशनरी शाळांमध्ये मुले शिक्षणाद्वारे डीएम, एसपी आणि अभियंता बनतात, परंतु तीच मुले परदेशी जातात आणि गोमांस खातात. त्यांना संस्कार मुळीच मिळत नाहीत. म्हणून लहान मुलांना शाळेत गीता आणि हनुमान चालीसा शिकवायला हवेत.'

ते पुढे म्हणाले कि, "मी अनेकांच्या घरी गेलो,यातील मोजक्या लोकांच्या घरात मला भगवत गीता, हनुमान चालीसा व रामायण हे हिंदू धर्मग्रंथ आढळले. आज आपल्या मुलांमध्ये पारंपरिक मूल्ये रुजवली गेली पाहिजे. आपल्या धर्मात अतेरिकेपणाला थारा नाही हे त्यांना कळले पाहिजे."

@@AUTHORINFO_V1@@