मोदी-शहांविरोधात आक्षेपार्ह विधान करणाऱ्या काँग्रेस नेत्यावर २४ तासांत १५ गुन्हे दाखल

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Jan-2020
Total Views |
ळ_1  H x W: 0 x


तमिळनाडू : नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात आंदोलन करताना तमिळ लेखक आणि काँग्रेस नेते नेल्लई कन्नन यांना बुधवारी अटक झाली आहे. तिरुनेलवेली पोलीस ठाण्यात त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. डेमोक्रेटीक पार्टी ऑफ इंडियातर्फे करण्यात आलेल्या आंदोलनादरम्यान त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्याविरोधात आक्षेपार्ह टीका केली होती.

या आंदोलना दरम्यान भाषण करतानाचा एक व्हीडिओ व्हायरल झाला होता. नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात बोलताना भडकाऊ भाषण दिल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. या प्रकरणी भाजप कार्यकर्त्यांनी कारवाईची मागणी केली होती. मंगळवार, ३१ डिसेंबर रोजी पोलीस त्यांच्या घरी पोहोचल्यानंतर छातीत दुखत असल्याचे कारण त्यांनी दिले होते. पोलीसांनी त्यांना रुग्णवाहिकेद्वारे इस्पितळात हलवले. त्यांच्याविरोधात भाजपसहित सत्ताधारी पक्ष एआयडीएमकेनेही तक्रार दाखल केली आहे.

 
 
 
@@AUTHORINFO_V1@@