पंतप्रधान मोदी दोन दिवसीय कर्नाटक दौऱ्यावर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Jan-2020
Total Views |


narendra modi_1 &nbs


शेतकरी सन्मान योजनेच्या तिसऱ्या टप्प्यातील निधीचे वाटप

 


नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारीपासून दोन दिवसांच्या कर्नाटक दौर्‍यावर असणार आहेत. याबाबत माहिती देताना पंतप्रधान कार्यालयाने सांगितले की, पीएम मोदी २ आणि ३ जानेवारी २०२० रोजी कर्नाटक दौर्‍यावर जाणार असून या दौऱ्यादरम्यान ते तुमकूर येथील श्री सिद्धगंगा मठ येथे भेट देतील, तेथे श्री श्री शिवकुमार स्वामीजींच्या स्मारक संग्रहालयाचा शिलान्यास करतील. याबरोबरच या परिसरात वृक्षारोपण देखील करणार आहेत.



शेतकरी सन्मान निधी योजनेचा तिसरा हप्ता आज जाहीर होणार

प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी योजनेचा तिसरा हप्ता आज कार्यक्रमादरम्यान जाहीर करण्यात येणार आहे. पंतप्रधान मोदी कर्नाटकातील या योजनेचा तिसरा हप्ता जाहीर करणार आहेत. या योजनेचा देशभरातील सहा कोटी शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी मोदी सरकारने ही योजना सुरू केली, ज्याद्वारे शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपयांची मदत मिळणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत आयोजित कार्यक्रमात हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात ऑनलाइन ट्रान्सफर करण्यात येणार आहेत.





पीएम मोदी यांच्या हस्ते कृषी कर्मण पुरस्काराचे वितरण होईल

 

तुमकुरमध्ये जाहीर सभेत पंतप्रधान मोदी कृषी कर्मण पुरस्काराचे वितरण करतील. पंतप्रधान प्रगतशील शेतकर्‍यांना कृषीमंत्री कृषी कर्मण पुरस्काराचे वितरणही करणार आहे.




पंतप्रधान मोदी डीआरडीओ यंग सायंटिस्ट प्रयोगशाळेचे उद्घाटन करणार आहेत

 

संरक्षण क्षेत्रातील देशी संशोधन क्षमता वाढविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी कर्नाटक दौर्‍यादरम्यान पाच डीआरडीओ यंग सायंटिस्ट प्रयोगशाळेचे उद्घाटन करतील. पंतप्रधान मोदी गुरुवारी पाच डीआरडीओ यंग सायंटिफिक प्रयोगशाळांना देशासाठी समर्पित करतील.


 

@@AUTHORINFO_V1@@