कोटातील 'त्या' शेकडो बालकांच्या मृत्यूवर काँग्रेसचे मौन का ?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Jan-2020
Total Views |

 
mayavti_1  H x



कोटा : राजस्थानातील काँग्रेसचे सरकार अतिशय बेजबाबदार असून यूपीतील हिंसाचार पीडितांची भेट घेण्यामागे प्रियांका गांधींचा राजकीय हेतू असल्याची टीका मायावती यांनी केली. राजस्थानातील कोटामध्ये शेकडो मुलांच्या मृत्यूवर बसपच्या प्रमुख मायावती यांनी काँग्रेसच्या प्रियांका गांधी आणि मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्यावर निशाणा साधला आहे. मायावतींनी ट्वीट केले आहे की, "कॉंग्रेस शासित राजस्थानच्या कोटा जिल्ह्यात झालेल्या जवळपास १०० निष्पाप मुलांच्या मृत्यूमुळे त्या शेकडो मातांची कोख रिकामी झाली हि घटना अतिशय वाईट व वेदनादायक आहे. इतके होऊनही मुख्यमंत्री गहलोत स्वत: आणि त्यांचे सरकार अजूनही या घटनेबद्दल उदासीन, असंवेदनशील आणि बेजबाबदारपणाने वागत आहे.





पुढे त्यांनी काँग्रेस सरचिटणीस प्रियांकावर देखील टीका केली, "कॉंग्रेस पक्षाचे सर्वोच्च नेतृत्व आणि विशेषत: महिला सरचिटणीस देखील या प्रकरणात मौन बाळगून आहेत हे अधिक खेदजनक आहे. ते म्हणाल्या की, यूपी मध्ये पीडितांची भेट घेतली त्याप्रमाणे कोटातील गरीब मातांना भेटून त्यांचे सांत्वन केले असते तर बरे झाले असते. त्यांच्या पक्षाच्या सरकारने केलेल्या दुर्लक्षामुळेच आज त्या शेकडो मातांची गोद उजाड झाली आहे."



दुसर्‍या ट्वीटमध्ये त्या म्हणतात
, "जर कॉंग्रेसच्या राष्ट्रीय सरचिटणीस राजस्थानच्या कोटा येथे गेल्या नाहीत आणि मृतक मुलांच्या 'मातांना' भेटल्या नाहीत तर यूपीतील पीडित कुटुंबियांना भेटण्यासाठी जाणे यामागे फक्त त्यांचा राजकीय हेतू असण्याचा विचार केला जाईल, याबाबत यूपीच्या जनतेला जागरुक रहावे लागेल."


@@AUTHORINFO_V1@@