'प्रसूती' रजेचा क्रिकेटमध्ये पायंडा ; जेस डफिन ठरली पहिली महिला क्रिकेटर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Jan-2020
Total Views |


asf_1  H x W: 0


नवी दिल्ली : कुठल्याही क्रीडा क्षेत्रामध्ये आई झाल्यावर बऱ्याच खेळाडूंना खेळ सोडण्याची वेळ येते. यावर प्रसूती रजेचा मुद्दा हा जागतिक स्तरांसहित क्रिकेटमध्येही गाजत आहे. यावर ऑस्ट्रेलिया बोर्डाने घेतलेल्या निर्णयावरून सर्वानीच त्यांची तारीफ केली आहे. ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट बोर्डाने आई होणाऱ्या क्रिकेटपटूंना एक वर्षाची सुट्टी आणि त्या काळातील वेतन देखील देण्यास सुरुवात केली आहे. या योजनेची पहिली मानकरी ऑस्ट्रेलिया महिला संघाची क्रिकेटपटू जेस डफिन ठरली आहे.

 

आई झाल्यानंतर क्रीडा क्षेत्राचा विचार केल्यास महिला खेळाडूंना एक वर्षापेक्षा अधिक काळ खेळापासून दूर रहावे लागते. अनेक महिला खेळाडूंना तर पुन्हा क्रीडा क्षेत्रात परतणे शक्य होत नाही. यावर ऑस्ट्रेलिया क्रिकेटने नवा निर्णय घेतला आहे. ऑस्ट्रेलिया क्रिकेटच्या निर्णयानुसार, आई होणाऱ्या क्रिकेटपटूंना एक वर्षाची सुट्टी आणि त्या काळातील वेतन देण्यात येणार आहे. इतकेच नव्हे तर बाळाचा जन्म होण्याआधीपर्यंत ती क्रिकेट न खेळण्यासंदर्भातील निर्णय देखील घेऊ शकते.

@@AUTHORINFO_V1@@