आता ममतांना त्यांच्याच भाषेत उत्तर ...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Jan-2020
Total Views |


amit shah_1  H


नवी दिल्ली : पुढील वर्षी पश्चिम बंगालमध्ये ममता सरकारचा कार्यकाळ संपणार आहे. त्यामुळे पुढच्या वर्षी निवडणूकींची घोषणा होईल, परंतु केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी त्यासाठी आत्तापासूनच जोरदार तयारी सुरू केली आहे. बंगाली लोकांमध्ये पकड मिळवण्यासाठी शाह बांगला भाषा शिकत आहेत. यासाठी त्यांनी शिक्षकाची नेमणूकही केली आहे. वृत्तसंस्थेच्या अहवालानुसार, अमित शहा बंगालमध्ये पश्चिम बंगालची भाषा समजून घेत त्यांच्या भाषेत जनतेला संबोधित करण्याचा प्रयत्न करीत आहेत, ज्यामुळे भाषण अधिक प्रभावी होईल. शाह यांनी शास्त्रीय संगीताचा अभ्यासही केला आहे. ते स्वतःच्या मनाला शांती देण्यासाठी शास्त्रीय संगीत आणि योग साधनेचा आधार घेतात.



पश्चिम बंगालमधील भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याने दिलेल्या माहितीनुसार
, भाजप अध्यक्ष बंगाली आणि तमिळसह देशातील वेगवेगळ्या राज्यात बोलल्या जाणाऱ्या चार भाषा शिकत आहेत. शाह यांना निवडणूक रणनीतीचा मास्टर मानले जाते, प्रत्येक निवडणुकीसाठी ते एक वेगळी रणनीती आखतात.



महाराष्ट्र
, हरियाणा आणि झारखंड विधानसभा निवडणुकीत पराभवामुळे अमित शहा यांनी बंगाल निवडणुकीची सूत्रे स्वीकारत नवी रणनीती आखली आहे. यासाठी तेथील कामगारांशी संवाद व समन्वय साधणे आवश्यक आहे. या रणनीतीमध्ये भाषेमुळे अडथळा येऊ नये, म्हणून ते बांग्ला भाषा शिकत आहेत. त्यांनी भाजप अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारण्यापूर्वी देशभर दौरे केले आणि देशातील प्रमुख तीर्थक्षेत्रांना भेटी दिल्या. यामुळे त्यांनादेशातील सर्व भागातील राजकीय, सामाजिक आणि धार्मिक बाबी समजून घेता आल्या.

@@AUTHORINFO_V1@@