मनातले ओळखणारा 'अल्बर्ट आईन्स्टाईन' भारतीयांच्या भेटीला

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Jan-2020
Total Views |
E 1 _1  H x W:
 
 

मुंबई : चेहर्‍याचे हावभाव ओळखणारा, समजून घेणारा किंवा मनातली खळबळ ओळखणारा असा 'अल्बर्ट आईन्स्टाईन' रोबो भारतीयांच्या भेटीला येत आहे. ३ ते ५ जानेवारी दरम्यान 'आयआयटी टेकफेस्ट'मध्ये रोबोला भेटण्याची संधी मिळणार आहे.

 

'अल्बर्ट आईन्स्टाईन' रोबोची भारतात ही पहिलीच भेट आहे. प्रेक्षकांमधील कोणत्याही व्यक्तीच्या प्रश्नाला उत्तर देण्याची क्षमता या रोबोमध्ये आहे. हाँगकाँगच्या हॅन्सन रोबोटिक्सने 'फेशिअल रेकगनिशन' सॉफ्टवेअरचा वापर करून हा रोबो तयार करण्यात आला आहे. तसेच एखाद्या व्यक्तीचे वय आणि लिंग सांगण्याची क्षमताही या रोबोमध्ये आहे.

 

विज्ञानाचा प्रचार आणि प्रसार व्हावा यासाठी हा रोबो भारतात आणण्यात येत आहे. मानवी मनाच्या भावना जाणण्याचा गुणदेखील या रोबोमध्ये आहे. आपल्या मनातील राग, भीती, आनंद, दुःख यासारखे द्वंद्वही हा रोबो ओळखतो. सॉफ्टवेअरमुळे चेहर्‍यावरील अनेक गोष्टींची नोंद घेत हा रोबो तत्काळ प्रतिक्रिया देतो. त्यात चेहरा पाहून वय आणि लिंग सांगण्याचे फीचरही आहे. तसेच प्रश्नांना तत्काळ उत्तरे देण्याचे वैशिष्ट्यही या रोबोमध्ये आहे. टेकफेस्टमध्ये या रोबोचे आकर्षण असणार आहे.
@@AUTHORINFO_V1@@