नव्या वर्षात अजय दिसणार ‘या’ दमदार भूमिकेत!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Jan-2020
Total Views |

ajay_1  H x W:



रोहित शेट्टीच्या ‘सूर्यवंशी’ चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये अभिनेता अजय देवगण दिसला आणि तो या चित्रपटात पुन्हा ‘सिंघम’ साकारणार असल्याच्या चर्चा प्रेक्षकांमध्ये रंगलेल्या असतानाच, अजय देवगणचा आणखी एक दमदार लुक व्हायरल झाला. १४ ऑगस्ट २०२०ला प्रदर्शित होणाऱ्या भुज: द प्राइड ऑफ इंडियाया चित्रपटातील हा अजयचा लूक असून, तो या चित्रपटात वायुसेना अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाची कथा १९७१ सालच्या भारत-पाक युद्धावर आधारित असून, अभिनेता अजय देवगण यात स्कॉड्रॉन लीडर विजय कर्णिकची भूमिका साकारत आहे.






अजयचा हा चित्रपटातील पहिला लूक, चित्रपटाचे दिग्दर्शक आणि लेखक अभिषेक दुधैया यांनी सोशल मिडीयावर शेअर केला. या चित्रपटाविषयी बोलताना निर्माता भूषण कुमार यांनी सांगितले की, ही वीर कथा नवीन पिढीपर्यंत नेणे फार महत्वाचे आहे. जेणेकरुन १९७१ च्या भारत-पाक युद्धात विशेष भूमिका बजावणाऱ्या स्कॉड्रॉन लीडर विजय कर्णिक यांनी त्यावेळी किती निर्भयपणे निर्णय घेतला हे त्यांना कळेल.


१९७१ च्या भारत-पाक युद्धाच्या वेळी स्कॉड्रॉन लीडर विजय कर्णिक हे भुज एअरबेसचे प्रमुख होते. यावेळी सुमारे ११० सैनिक त्यांच्यासमवेत उपस्थित होते, पण बॉम्बस्फोटाच्या वेळी माधापूर गावातील ३०० हून अधिक महिला तेथे आल्या आणि हवाई दलाला मदत केली.

@@AUTHORINFO_V1@@