’नाईट लाईफ’चा निर्णय लांबणीवर पडण्याची शक्यता, गृहमंत्र्यांचे संकेत

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Jan-2020
Total Views |


nighlife_1  H x



मुंबई
: राज्याचे पर्यटन आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या महत्वकांक्षी प्रकल्पांपैकी एक मानल्या जाणार्‍या ‘नाईट लाईफ’चा निर्णय लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी रविवारी केलेल्या विधानांमुळे तसे संकेत मिळाले. २६ जानेवारीच्या मध्यरात्रीपासून मुंबईत ‘नाईट लाईफ’ सुरु करण्यासाठी पर्यारण मंत्री आदित्य ठाकरे प्रयत्नशील असतानाही गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मात्र अतिरिक्त पोलीस असल्याची माहिती घेतल्यानंतरच याबाबत पुढील निर्णय घेण्यात येणार असल्याचे म्हटल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारमध्ये विसंगती असल्याचे पहायला मिळाले.


नाईट लाईफबाबत विस्तृत प्रस्तावावर बुधवारी दि
. २२ जानेवारी रोजी होणार्‍या मंत्रिमंडळात पहिल्यांदा चर्चा होईल. त्यानंतरच नाईट लाईफसंदर्भात योग्य निर्णय होऊ शकेल, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी रविवारी दिली. आदित्य ठाकरे यांनी नाईट लाईफबाबतचा निर्णय घेतल्यानंतर २६ जानेवारीच्या मध्यरात्रीपासून या निर्णयाची प्रायोगिक तत्वावर अंमलबाजवणी सुरू होणार होती. मात्र अनिल देशमुखांच्या वक्तव्यामुळे २६ जानेवारीपासून हा निर्णय लागू होणार की नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे.


भाजपचे आमदार आणि माजी शालेय शिक्षण मंत्री अ
ॅड आशिष शेलार यांनी या नाईट लाईफप्रक्रियेनंतर पोलीस यंत्रणेवर मोठ्या प्रमाणात ताण येणार असल्याचे सूतोवाच केले होते. त्यांनी हा मुद्दा उपसथित करताच रविवारी गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही या मुद्द्याव भाष्य केले ते म्हणाले, “सध्या पोलिसांवर मोठा ताण आहे. पोलीस १२ ते १४ तास दररोज काम करत आहेत. इतक्या कमी वेळेत नाईट लाईफ सुरू करण्यासाठी लागणारी यंत्रणा अजून तयार नाही. नाईट लाईफच्या निर्णयानंतर त्यासाठी अतिरिक्त पोलीस आहेत का? याची माहिती घ्यावी लागेल. त्यानंतर याबाबतचा निर्णय घेतला जाईल. सर्व माहिती घेऊन त्याबाबत आढावा घेतला जाईल. मात्र या २६ जानेवारीपर्यंत याबाबत अंतिम निर्णय होईल असे वाटत नसल्याचे देशमुख यांनी सांगितले. त्यामुळे नाईट लाईफच्या निर्णयाची घोषणा करताना पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी घाई केली का? नाईट लाईफबाबतचा निर्णय घेताना संबंधित इतर खात्यांच्या मंत्र्यांशी चर्चा केली नाही का? महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये विसंगती आहे का? असे विविध प्रश्न उपस्थित करण्यात आले. २६ जानेवारीच्या मध्यरात्रीपासून सुरु होणार्‍या या नाईट लाईफच्या निर्णयाचे महाविकास आघाडीतील सर्वच नेत्यांनी याचे स्वागत केले होते. मात्र अंमलबजावणीसाठी सर्व स्तरावर त्यांची तपासणी केली जाणार आहे. त्यामुळे नाईट लाईफ येत्या २६जानेवारीपासून सुरु होणार की नाही, हे २२ जानेवारी रोजी होणार्‍या मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर स्पष्ट होणार आहे.

@@AUTHORINFO_V1@@