भाकरी नाही, ब्रेड खा...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Jan-2020   
Total Views |


night life_1  H



दिवसा काम करून थकता, ट्रॅफिकमध्ये अडकून पार चेंदामेंदा होता, दिवसा घरामुळे, कामामुळे मजा करायला भेटत नाही, जगता येत नाही. हे पाहा आम्ही यावर उपाय काढला. रात्री जगा. आता नाईट लाईफ सुरू करणार!


भाकरी नाही मिळत का
? ब्रेड खा... असे म्हणणारी राणी काही परेदशातच नाही. आमच्याकडेही अशा राजेशाही पद्धतीने विचार करणारे लोक आहेत. दिवसा काम करून थकता, ट्रॅफिकमध्ये अडकून पार चेंदामेंदा होता, दिवसा घरामुळे, कामामुळे मजा करायला भेटत नाही, जगता येत नाही. हे पाहा आम्ही यावर उपाय काढला. रात्री जगा. आता नाईट लाईफ सुरू करणार!



या निर्णयाने समस्त कष्टकरी जनता
, मोलमजुरी करणारे, दोन वेळचे खायचे वांधे असलेले सगळेच खुश होते. १० रुपयांत थाळी. दिवसा ती मिळणार होती, आता नाईट लाईफ सुरू करणार म्हटल्यावर रात्रीची पण दगदग मिटली. १० रुपयांत थाळी. आणखी काय हवे? यावर नेहमीप्रमाणे काही नतद्रष्ट लोकांनी डोकं खायला सुरुवात केलीच. काहींचे म्हणणे की, मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारितले प्रत्येक इस्पितळ म्हणजे या सम हेच आहेत. एका एका पलंगावर दोन दोन रुग्ण. दोन पलंगांमध्ये दोन रुग्ण, व्हरांड्यात, जिथे जागा मिळेल तिथे रुग्ण. त्या रुग्णांनी घरूनच आपले अंथरूण-पांघरूण आणि सारे काही आणायचे. साधारण १०० रुग्णांची सोय असलेल्या रुग्णालयात मोजता न येतील इतके रुग्ण.



मुंबईच्या नाईट लाईफमध्ये मुंबईतल्या सगळ्या इस्पितळांतले डे
-नाईट लाईफ सुधारणार असेल तर आम्हाला काही प्रॉब्लेम नाही. याच मुंबईत गल्लीतल्या चुणचुणीत, होतकरू पोरांमधील एकदोन जण परिस्थितीने गुन्हेगारीकडे वळत आहेत. चुकूनमाकून घडलेल्या गुन्ह्यांनंतर त्यांना पद्धतशीरपणे इतर गुन्ह्यांमध्ये अडकवून त्यांचे आणि त्यांच्या कुटुंबाचे आयुष्यबरबाद केले जाते. याची कारणमीमांसा होणार का? मुंबई आज गुन्हेगारी दुनियेच्या बॉम्बवर बसली आहे. डोळे आणि मन उघडे ठेवून या तरुणांच्या माणूसपणाबद्दल विचार होणार आहे का? की नाईट लाईफमध्येही कोणताही गुन्हा घडला की, चौकशीच्या नावाखाली पकडा यांना असेच होणार आहे? तसेच होणार नसेल तर खुशाल करा नाईट लाईफ. आमचे जास्त मागणे नाही. तुमची तुम्ही नाईट लाईफ सुरू करा. पण दिवसभर राबून आपल्या पोराबाळांना माणूस म्हणून जगवण्यासाठी प्रयत्न करणार्‍यांसाठीही एखादे जगणे सुरू करता येते का ते बघा. अर्थात प्रश्नांचे उत्तर नाही, पण तरीही नाईट लाईफच्या अनुषंगाने ओघाने आले म्हणून, इतकेच.



नाईट लाईफ आणि प्रश्न
..


सीने में जलन
, आँखो में तुफान सा क्यूं है, अशा टाईपच्या लोकांना विचारले, “तुम्हाला काय वाटते नाईट लाईफबद्दल? तर त्यांचे म्हणणे काय वाटते म्हणजे आमची तर २४ घंटा लाईफच आहे. रात्र काय न दिवस काय? टीचभर पोटासाठी आणि घरसंसाराच्या काळजीसाठी दिवस म्हणू नका, रात्र म्हणू नका, आम्ही कामातच असतो. तीन तीन शिफ्ट करतो. मुंबई कधी बंद असते? उलट ती तर रात्रीच सुरू असते. आता नव्याने काय बुवा सुरू होणार आहे? त्यांना म्हटले, “अरे वेड्या कामासाठी नाही काही, तर मजा करण्यासाठी नाईट लाईफ सुरू होणार आहे.” त्यावर एकाचे उत्तर, ”तुम्हाला कोणी सांगितले रात्री मुंबईमध्ये लाईफ नसते म्हणून? सगळे छंदीफंदी, दारूडे बेवडे, हाफ मर्डर, फुल मर्डरवाले सगळे सगळे जीवाची मुंबई करायला रात्रीच निघतात. रात्रीची मुंबई तेच तर जगतात.”( छे! या मिडल क्लास, नव्हे नव्हे गल्लीबोळात राहणार्‍या लोकांना कसले कौतुकच नाही.) तरीही त्यांना म्हणाले, “अरे नाईट लाईफ सुरू झाली की, तुम्हाला रोजगार मिळतील. रात्री दुकानं-बिकानं सगळे सुरू राहील. डबल रोजगार होतील. एकच तर लाईफ आहे, ती दिवसा जगली पाहिजे, रात्री पण जगली पाहिजे.



तर यांचे म्हणणे दिवसा रस्त्याच्या खड्ड्यांमुळे हाडाची पार काडं होतात
. रात्री तर मुंबईच्या रस्त्यावर लाईटस असतात का? बसस्टॉप, कचराकुंडी, रेल्वेस्थानक इथे रात्री नशेखोरांची दिवाळी चालते, त्यांच्यापासून संरक्षण पाहिजे. कायदा-सुव्यवस्थेचे काही सांगू नका. इथे आम्ही दिवसाढवळ्या जीव मुठीत धरून राहतो. रात्रीची जबाबदारी तुम्ही घेणार का? आता यांना कुणी सांगावे की, अरे हे नाईट लाईफ आपल्यासाठी नाही. आपला त्याच्याशी काय संबंध. दिवसाही मरून जगणारे आपण. तसे म्हणा आपण रात्री, पण जगतो पण उद्याच्या चिंतेत. नळाला पाणी येईल ना? उद्या कोणी बंद-बिंद तर करणार नाही ना? घरातून बाहेर पडलोय खरे, पण पुन्हा घरी येऊ ना? सतराशेसाठ चिंता करत रात्रभर जीवाची मुंबई नव्हे जिवाची ऐशीतैशी करतो आणि रात्र काळजावर घेऊन सकाळी उठतो. नाईट लाईफला विरोध नाही. पण नाईट लाईफसारखाच सर्वसामान्यांच्या भाकरीचा, जगण्याचा सनातन प्रश्न कधी सुटणार?

@@AUTHORINFO_V1@@