सब समाज को साथ लिए

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Jan-2020   
Total Views |
DR _1  H x W: 0



'नया भारतीय संविधान' हे अतिशय फालतू पुस्तक व्हॉट्सअ‍ॅपवर पाहिले आणि मनात अनेक स्मृती जागृत झाल्या. अनुभवलेला रा. स्व. संघ डोळ्यासमोर आला. तो मांडायलाच हवा...

'नया भारतीय संविधान' म्हणून एक अतिशय फालतू पुस्तक व्हॉट्सअ‍ॅपवर पाहिले. त्यावर सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवतांचा फोटो आणि नावही छापले आहे. त्यात अतिशय मूर्ख आणि असंबद्ध विधानेहीछापली आहेत. अर्थात, ती विधानं तीच तीच आहेत. म्हणजे रा. स्व. संघाला कसे संविधानामधून मागासवर्गीय आणि स्त्रियांचे हक्क डावलायचे आहेत. ब्राह्मणांना कसे सर्वसत्ताधीश बनवायचे आहेत. यासाठीची सगळी अगदी अगदी महामूर्ख विधाने त्यात छापली आहेत. वर त्यात सरसंघचालकांच्या नावाने सूचनाही मागितल्या आहेत. हे पाहून संताप तर आलाच आणि प्रकाशक, वितरक वगैरेंचे नाव न छापताच आपल्या मनातले कीटाळ सरसंघचालकांच्या नावावर खपवू पाहणार्‍यांचे आश्चर्यही वाटले. कारण, एकतर लोकशाही देशात, जिथे मोठ्या संख्येने विविध समाजगट राहतात.

तिथे स्वत:च्या नावाने हे असले अतिशय निकृष्ट दर्जाचे विचाराचे पुस्तक सरसंघचालक स्वत:चाच फोटो टाकून छापतील? हास्यास्पद. दुसरे या पुस्तकात नव्या संविधानानुसार केवळ आणि केवळ ब्राह्मणांना सगळेच अधिकार दिले आहेत.आता हे संविधान लागू करायला आणि मान्य करायला संसदेत, प्रशासनात आणि न्यायालयातही सगळे ब्राह्मण आहेत का? नाहीच. मनात नाही, तरी म्हणावेसे वाटते की, देशाचा पंतप्रधान हा इतर मागासवर्गीय समाजाचा आहे आणि राष्ट्रपती मागासवर्गीय समाजाचा. हो, हे दोघेही रा. स्व. संघाचे स्वयंसेवक आहेत. त्या रा. स्व. संघाचे ज्यांचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत आहेत. त्यामुळे सरसंघचालकांच्या नावाने हे असले भिकार पुस्तक काढणार्याच्या बुद्धीची कीव येते. देव अक्कल वाटताना हा पुस्तक लिहिणारा कुठे कलडमला असेल? नक्कीच हा 'विद्रोह... विद्रोह' म्हणत स्वत:च्या बुडाला आग लावायला गेला असेल किंवा 'आझादी... आझादी' म्हणत कुठेतरी बरबादी करायला गेला असेल. असो, पण हे पुस्तक पाहून सरसंघचालकांचे मार्गदर्शन आठवले.

२०१४ ची घटना आहे, बडोद्याला समरसता मंचची राष्ट्रीय बैठक होती. सरसतेचे कार्य करणारे देशभरातील बंधु-भगिनी त्या बैठकीला उपस्थित होते. पाच दिवसांची बैठक होती, तीही जैन मंदिरामधील वास्तूंमध्ये. तेथील श्रद्धा-परंपरांनुसार महिलांना काही भागात जाण्यास बंदी होती, तसेच मुनीमहाराजांसमोर किंवा बाजूने जाणेही शिष्टाचार संमत नव्हते. याच प्रकारचे दुसरेही अनेक शिष्टाचार आणि श्रद्धा होत्या. महाराष्ट्रातल्या मोकळ्या संस्कृतीत वाढलेल्या आम्हा काही महिलांना अगदी बांधल्यासारखे झाले. आमच्या सोबतच्या बंधूंनाही ते काही पटत नव्हते. आमच्या सोबत तिथे पुण्याच्या प्रा. शामा घोणसेहीहोत्या. सर्व भगिनींशी चर्चा झाल्यावर सगळ्या भगिनींनी ठरवले की, आपल्याला अशा वातावरणाची सवय नाही. हे असे का? याबाबत कुणाशी बोलावे? बैठकीच्या वरिष्ठांशी बोलायचे ठरवले.

इतक्यात कळले की, बैठकीला रा. स्व. संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत आले आहेत. ते बैठकीतील भगिनींशी संवाद साधणार आहेत. आम्ही सगळ्याजणी बैठक कक्षात बसलो. सरसंघचालक आले. क्षेमकुशल विचारले. भगिनींच्या चेहर्‍यावर तणाव का? काही प्रश्न आहेत का? असे त्यांनी विचारले. यावर शामा घोणसे आणि महिलांनी सांगितले की, इथे वावरताना आमच्याकडून खूपदा इथल्या प्रथा चुकतात. इथे अजूनही अशा श्रद्धा जपल्या जातात? स्त्री आणि पुरुष यांना वेगवेगळ्या दर्जाची वागणूक कशी? यावर सरसंघचालकांनी सगळे म्हणणे शांतपणे ऐकून घेतले. भगिनींना झालेल्या त्रासाबद्दल मनापासून हळहळ व्यक्त केली. आपले समरसतेचे कार्य, तळमळ याची व्याप्ती सर्वच स्तरावर गरजेची आहे, असे ते म्हणाले. प्रत्यक्ष सरसंघचालकांनी इतर सर्व विषय बाजूला ठेवून आपला विषय ऐकला, सर्व भगिनींना बरे वाटले. दुसर्‍या दिवशी सरसंघचालकांचे उद्बोधन होते. समरसता विषयावर मार्गदर्शन करताना त्यांनी 'मातृशक्तीचा सन्मान' या विषयावर मत मांडले. त्यामध्ये त्यांनी महिलांचे समाजातील स्थान, रितीरिवाज, रूढी यांमध्ये महिलांना दिली जाणारी दुय्यम वागणूक याचा ऊहापोह केलाच, वर त्यांनी सांगितले की, मातृशक्तीचा सर्वत्रच आदर करायला हवा. समरसतेचा विचार करताना मातृशक्तीशी आपले वागणे कसे असते? समान सन्मान, आदर, जगणे याबाबत विचार करतो का? साधारण अशाच प्रकारचे मत त्यांनी मांडले. त्यांचे मार्गदर्शन संपले. नंतर भोजन होते. मात्र, आता जादूची काडी फिरावी तसे झाले. महिलांना खास अशी वेगळी वाटणारी व्यवस्था नव्हती. कालचे जे वातावरण भगिनींना खुपलेले ते बदलले होते. ही सरसंघचालकांच्या बोलण्याची किमया होती.

या बैठकीमध्ये राष्ट्रीय स्तरातूनसमरसतेचे कार्यकर्ते आले होते. महाराष्ट्रामध्ये समरसतेचे कार्य वटवृक्षासारखे वाढवणारे रमेश पतंगे, दादा इदाते वगैरेंनी महाराष्ट्रामध्ये समरसतेचे कार्य कसे चालते हे सांगितले. पुढे उत्तर भारतातील कार्यकर्ते उभे राहिले. त्यांनी सांगायला सुरुवात केली की, आम्ही गावाकुसाबाहेरच्या वस्तीत जातो. त्यांच्या घरी चहा पितो. आमच्या घरी त्यांना पूजेला बोलावतो. वगैरे वगैरे... प्रत्येकाने अशाच प्रकारचे निवेदन देण्यास सुरुवात केली. या निवेदनांवर बोलताना सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी विचार मांडले की, “समरसतेचे कार्य म्हणजे जोपर्यंत एक गाव, एक पाणवठा, एक मंदिर आणि एक स्मशान होय. आता प्रत्येकाच्या घरात नळातून पाणी द्यायची व्यवस्था आहे, पण तरीही गावामध्ये इतकी एकी हवी की जातपात न पाहता एखाद्याच्या दु:खात त्याच्यासोबत उभे राहताआले पाहिजे. हा माझा भारतीय बांधव आहे, त्याच्या संकटकाळी मी त्याला मदत करायलाच हवी, हे माझे कर्तव्यच आहे, ही भावना सर्वच स्तरावर असावी. तेव्हाच म्हणू शकतो की, आपण समरसतेचे कार्यकर्ते आहोत.”



DR _2  H x W: 0


सरसंघचालकांची समरसतेची व्याख्या ऐकून सगळे स्तब्ध झाले. कारण, हे कार्य म्हणजे सतीचे वाण आहे. कितीही म्हटले तरी एक गाव-एक पाणवठा, एक मंदिर ही समरसता आणण्यासाठी गावातील प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष असलेली जातिप्रथा नष्ट होणे गरजेचे आहे. थोडक्यात, सरसंघचालकांनी अप्रत्यक्षपणे मांडले होते की, एखाद्याच्या घरी चहापान करून जातिव्यवस्थेची विषमता संपत नाही, तर ती आधी मनातून, विचारातूनहीसंपवली म्हणून संपत नाही, तर मनातून विचारातून आणि व्यवहारातूनही ती कायमची हद्दपार झाली पाहिजे. त्या बैठकीतून बाहेर आले. मनात समरसतेविषयी अनेक विषय फेर धरू लागले. मुंबईतील काही विद्रोही कवी मित्रांनी समरसता नव्हे तर समता म्हणत माझ्याशी घातलेला वाद, भांडणही आठवले. वाटले, 'समता, समता' करणारेही 'एक गाव-एक मंदिर-एक स्मशाना'चा पुरस्कार करतात का? नाही. उलट जेवढे तुकडे पडतील तेवढे चांगले असेच भाव असतात. म्हणजे असे की त्यांच्या मते, ब्राह्मण तर परकेच आहेत. पण हिंदू इतर मागासवर्गीय आणि मागासवर्गीय हेही एकमेकांपासून वेगळे. इतकेच काय हिंदू समाजातील मागासवर्गीय आणि बौद्ध समाजातील मागासवर्गीय हेसुद्धा एकमेकांपासून वेगळे.

माझ्या आडनावावरून साळवी की साळवे? साळवी असेन तर मराठा किंवा इतर मागासवर्गीय असेन आणि साळवे असेन तर मागासवर्गीयच असणार. त्यातही मागासवर्गीय म्हणजे हिंदू समाजातील की बौद्ध समाजातील? यावर माझ्या सोबतच्या व्यक्तीने सांगितले की 'उदबत्ती'ही नाही आणि 'मेणबत्ती'ही नाही. 'मधली' आहे. 'मधली' म्हणजे काय? यावर स्पष्टीकरण होते की, जातिव्यवस्थेमध्ये इतर मागासवर्गीय मध्येच आहेत ना, ना तुम्ही उच्चवर्णीय नाहीत आणि तुम्ही स्वत:ला आमच्यासारखे मागासवर्गीयपण समजत नाहीत. या घटनेनंतर मला कळले की, हिंदू समाजातील मागासवर्गीयांसाठी 'उदबत्ती' हा 'कोडवर्ड' तर बौद्ध मागासवर्गीयांसाठी 'मेणबत्ती' हा 'कोडवर्ड.' हा 'कोडवर्ड' मी प्रत्यक्ष अनुभवला आहे. अर्थात, 'समता' बोलून समरसतेला शिव्या घालणारे सगळेच नसतात. काही सन्माननीय अपवादही आहेत म्हणा. तर असो, सरसंघचालकांनी समरसतेचे खरे विश्व आमच्यापुढे खुले केले.

पुढे २०१५ साली पुण्याला रा. स्व. संघाचे 'शिवशक्ती संगम' झाले. यामध्ये मोठ्या संख्येने महिला वर्गही सहभागी झाला होता. लाखोंच्या संख्येने स्वयंसेवक बांधव उपस्थितहोते. यावेळी कशावर बोलले जाईल? याची अटकळ घेताना काही विद्रोही गटांच्या चर्चा सुरू झाल्या. त्यांचे म्हणणे धर्माबद्दल बोलतील,आता काय त्यांचेच सरकार आले. काही म्हणाले, संविधान बदलायचे असेल, आरक्षणकाढायचे आहे त्यांना. काय बोलतात ते पाहायला हवे. मनुवादी लोक, मागासवर्गीय आणि बायकांना पुन्हा गुलाम करायचे असेच बोलतील. सरसंघचालकांचे भाषण सुरू झाले. हे सगळे विद्रोही आपले विरोधाचे हत्यार परजूनच बसले होते. सरसंघचालक म्हणाले, “शक्तीशिवाय शिव अपूर्ण आहे.” मातृशक्तीचा गौरव त्यांनी केला. महिलाशक्तीचा वारसा त्यांनी विशद केला. त्यांनी सांगितले की, एकमेकांशिवाय 'शिव' आणि 'शक्ती' अपूर्ण आहेत. त्यामुळे शक्तीचा सन्मान करायलाच हवा.

 

हे सगळे ऐकून बहुतेकांची तोंडे काळीठिक्कर पडली. कारण, वादविवाद करताना स्वत:ला पुरोगामी मानणार्‍या लोकांनी मला सांगितले होते की, त्यांची सत्ता आली की, बघ मागासवर्गीयांना आणि तुम्हा स्त्रियांना पळता भुई थोडी होईल. त्यांचे हे विधान २०१४ च्या आसपास मी सातत्याने ऐकलेले, त्याला प्रतिवादही केलेला. शोधक दृष्टीने पाहू लागले की, खरेच रा. स्व. संघाला मातृसंस्था मानणारीभाजप सत्तेवर आली तर असे काही होईल का? पण त्यांची निराशा झाली. उलट २०१४ नंतर महिलांना सन्मानाचे जीवन देणार्‍या अनेक योजना सरकारने जाहीर केल्या. 'बेटी बचाओ बेटी पढाओ' ही योजना तर सर्वोत्तमच म्हणावी लागेल. त्यानंतर हिंदू समाजातील भगिनींसाठीही नव्हे तर मुसलमान भगिनींच्या मानवतेचा विचार करूनही या सरकारने 'तिहेरी तलाक' विरोधी कायदा केला. या पार्श्वभूमीवर वाटले की, स्त्रियांना पुन्हा गुलाम करतील, अशी भीती ज्यांच्याबद्दल व्यक्त केली होती ते तर स्वधर्मातील सोडाच परधर्मीय भगिनींनाही माणूस म्हणून आयुष्य देण्यासाठी काम करतात.

 

महिलाशक्तीविषयी समाजात सकारात्मक वातावरण तयार झाले. पण, मग संविधानाबद्दल काही वावगे घडते का, हे पाहण्यासाठीही काही लोक टपून बसलेले. कारण, त्यांनी मांडणी केलेली की, रा. स्व. संघ संविधान बदलणार. त्यांना आरक्षण हटवायचे आहे. त्यांना ब्राह्मणांचे वर्चस्व आणायचे आहे. हे सगळे सांगणारे ते संविधान आणणार. हे सगळेही २०१४ पासूनच ऐकलेले. पण प्रत्यक्षात पाहिले तर सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत अनेकदा मार्गदर्शन करताना म्हणाले की, “संविधानातील तरतूदी मौलिक आहेत, अत्यंत महत्त्वाच्या आहेत. संविधानाचा पुनर्विचार करण्याची गरजच नाही.” तसेच आरक्षणाबद्दलही त्यांचे मत की, जोपर्यंत समाजात आरक्षणाची गरज आहे, तोपर्यंत आरक्षण असायलाच हवे. अर्थात, कोणी म्हणेल की, हे बोलण्यासाठी वर वर बोलले असेल. पण संघातील कोणत्याही पदावरनसलेल्या संघ स्वयंसेवकाचे म्हणणेही हेच असते की, 'हो आरक्षण असायलाच हवे.' तो आरक्षणाला विरोध करतच नाही. कारण, तो ज्या संघशाखेच्या मुशितून घडतो तिथे समाजातील अत्यंजाच्या कल्याणाचीच कामना केली जाते आणि त्यासाठीच कार्य केले जाते. 'सब समाज को साथ लिये' असा मंत्रच त्यांना बाळकडू म्हणून दिला जातो. त्यामुळे २०१४ ते २०१९च्या काळात आरक्षणाला धक्का तर लावला गेला नाहीच. वर विविध समाजगटांच्या आरक्षणाबद्दलही सकारात्मक भूमिका घेतली गेली.

 

थोडक्यात रा. स्व. संघाबाबत, सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत, भाजप आणि नरेंद्र मोदींबाबत काहीबाही बरळण्याचे षड्यंत्र सुरू आहे. पण सत्याला आच नसते. ते सर्वशक्तिमान असते. सत्य काय आहे, हे सांगण्याची गरजच पडत नाही. कारण, 'सब समाज को साथ लिये'चा मंत्र जपत 'तेरा वैभव अमर रहे माँ' म्हणत रा. स्व. संघ आणि संबंधित सर्वांचे कार्य निरलसपणे सुरू आहे. त्यांना कुणाच्या सर्टिफिकेटची गरजच नाही.



@@AUTHORINFO_V1@@