बिहारमध्ये अखेर युतीची घोषणा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Jan-2020   
Total Views |


alliance bihar_1 &nb



अमित शाह यांच्या घोषणेनंतर-जनता दल (यु) शांत होण्याची शक्यता आहे. बिहारमध्ये नितीशकुमार हेच आमचे नेते राहतील,चेहरा राहतील, असेही शाह यांनी सांगितले असल्याने, युतीबाबत कोणतीही शंका राहिलेली नाही, असे भाजप नेत्यांना वाटत आहे.


ऑक्टोबर महिन्यात बिहारमध्ये होणारी विधानसभा निवडणूक भाजप व जनता दल
(यु) एकत्रपणे लढतील, अशी घोषणा भाजपचे अध्यक्ष अमित शाह यांनी केल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण शांत होण्याची चिन्हे आहेत. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांची काही विधाने पाहता-भाजप-जनता दल (यु) युतीबाबत साशंकता वर्तविली जात होती. ती शाह यांच्या विधानाने संपुष्टात आली आहे.२०२० मध्ये दिल्ली व बिहार या दोन महत्त्वाच्या राज्यांत विधानसभा निवडणुका होत आहेत. दिल्ली निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे, तर बिहारची निवडणूक ऑक्टोबर- नोव्हेंबर महिन्यात होईल.



चढउतार


बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांचे भाजपशी असलेले संबंध फार मधुर राहिलेले नाहीत
. आता त्यांनी एनआरसीबाबत केंद्र सरकारच्या विरोधात भूमिका घेतली आहे. या गोष्टीची गरजच काय, बिहारमध्ये लागू होण्याचा संबंधच काय, अशी विधाने त्यांनी केली होती. मे महिन्यात झालेल्या लोकसभा निवडणुकीनंतर त्यांनी केंद्रीय मंत्रिमंडळात सहभागी होण्यास नकार दिला होता. जनता दल (यु)चा एक प्रतिनिधी सरकारमध्ये सामील करण्याची तयारी भाजपने दाखविली होती. मात्र, आम्हाला सांकेतिक सहभाग नको, असे सांगत नितीशकुमार यांनी सरकारमध्ये जाण्यास नकार कळविला. तेव्हापासून भाजप-जनता दल (यु) संबंधात चढउतार सुरू आहेत. अमित शाह यांच्या घोषणेनंतर-जनता दल (यु) शांत होण्याची शक्यता आहे. बिहारमध्ये नितीशकुमार हेच आमचे नेते राहतील, चेहरा राहतील, असेही शाह यांनी सांगितले असल्याने, युतीबाबत कोणतीही शंका राहिलेली नाही, असे भाजप नेत्यांना वाटत आहे. मात्र, याचा अर्थ नितीशकुमार काय करतील, हा प्रश्न मिटलेला नाही. नितीशकुमार हे हवा ओळखून निर्णय घेणारे नेते आहेत. झारखंड हा बिहारचाच भाग होता. झारखंडमध्ये भाजपला धक्का बसला, हे त्यांनाही दिसले आहे. नितीशकुमार यांची नजर आता दिल्ली विधानसभा निवडणुकीकडे लागली आहे. दिल्ली विधानसभेचे निकाल कसे लागतात, याकडे त्यांचे लक्ष लागले आहे.



दबावतंत्र


दिल्लीचे निकाल लागल्यानंतर नितीशकुमार राजकीय हवानामाचा अंदाज घेतील
, असे त्यांचे समर्थक सांगत आहेत. राजकीय हवामान भाजपच्या बाजूने असल्यास ते युती कायम ठेवतील आणि हवामान प्रतिकूल असल्यास ते युतीचा फेरविचार करतील, असे सांगितले आहे. अर्थात ही भूमिका त्यांच्या सल्लागारांची आहे. स्वत: नितीशकुमार यांनी सध्या तरी भाजपसोबत राहण्याची भूमिका घेतली आहे, तर त्यांच्या सल्लागारांनी मात्र भाजपच्या विरोधात भूमिका घेतली आहे. सरतेशेवटी नितीशकुमार भाजपशी युती करतील, मात्र ते जागावाटपात भाजपच्या नाकी दम आणतील, असा एक अंदाज वर्तविला जात आहे. जागावाटपात जास्तीत जास्त जागा पदरात पाडून घेण्याचा हा त्यांचा एक प्रयत्न असल्याचेही म्हटले जात आहे.


महाराष्ट्रात शिवसेनेबाबत जे झाले ते
, बिहारमध्ये जनता दल यांच्या बाबतीत होऊ नये, असे सकारात्मक प्रयत्न भाजपकडून सुरू आहेत. या प्रयत्नांचा सुपरिणाम नितीशकुमार यांच्यावर होईल, अशी आशा भाजप नेत्यांना वाटत आहे. बिहार विधानसभा निवडणूक जिंकल्यास ती भाजपसाठी मोठी उपलब्धी राहणार आहे. कारण, २०१५च्या निवडणुकीत भाजपला राज्यात पराभवाचा सामना करावा लागला होता. २०२०चा विजय तो पराभव पुसून टाकणारा ठरेल.



पहिली यादी


दरम्यान
, दिल्ली विधानसभेची प्रचारमोहीम जोरात सुरू झाली आहे. आम आदमी पक्षाने आपली उमेदवार यादी घोषित करण्यात आघाडी घेत, जवळपास सर्व जागांसाठी आपले उमेदवार घोषित केले. भाजपची पहिली यादी शुक्रवारी घोषित झाली. पहिल्या यादीत ५७ जागांसाठी उमेदवारांची घोषणा करण्यात आली. ही यादी पाहता पक्षाने योग्य उमेदवार मैदानात उतरविले आहेत, असे म्हणता येईल.


काँग्रेसजवळ उमेदवारांची उणीव


काँग्रेसजवळ सबळ उमेदवार नसल्याने
, पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांनी दिल्लीच्या सर्व बड्या नेत्यांना मैदानात उतरण्यास सांगितले असल्याचे समजते. मात्र, पक्षाच्या जाहीरनामा समितीचे प्रमुख अजय माकन परदेशी निघून गेले आहेत. २०१५च्या निवडणुकीत पक्षाला एकही जागा जिंकता आली नव्हती. यावेळी काही जागा जिंकण्याचा प्रयत्न काँग्रेसचा राहणार आहे. आम्हाला दिल्लीत विजय मिळण्याची कोणतीही शक्यता नाही. आमचा प्रयत्न दुहेरी आकडा गाठण्याचा राहणार आहे, असे एका नेत्याने प्रस्तुुत प्रतिनिधीस सांगितले. या नेत्याकडे प्रचार समितीची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.


भाजप आश्वस्त


दुसरीकडे भाजप दिल्लीतील विजयाबद्दल आश्वस्त असल्याचे सांगितले जाते
. दिल्ली विधानसभेत आम्ही किमान ४० जागा जिंकू, असा दावा पक्षाकडून केला जात आहे. दिल्लीतील निवडणूक भाजपचे नवे मनोनित अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांच्यासाठी पहिली निवडणूक राहणार असल्याने त्यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. नड्डा स्वत: दिल्ली निवडणुकीवर लक्ष ठेवून आहेत. नड्डा यांच्या नेतृत्वाखाली दिल्ली जिंकण्याचा चमत्कार केला जाईल, असे भाजप गोटातून सांगितले जात आहे. दिल्लीचे निकाल नड्डा यांच्यासाठी विजयी सलामी असतील, असे भाजपला वाटते. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर हे या निवडणुकीचे प्रमुख आहेत. तेही दिल्ली जिंकण्यासाठी अथक परिश्रम घेत आहेत. दिल्लीत चमत्कार होईल, असे भाजप गोटातून सांगितले जात आहे. मागील २२ वर्षांत दिल्ली आमच्यासाठी ‘अजेय‘ ठरत आहे, यावेळी आम्ही दिल्ली जिंकूच, असे पक्षाचे नेते सांगत आहेत.


आम आदमीचा दावा


आम आदमी पक्षदेखील ही निवडणूक जिंकण्याचा दावा करीत आहे
. दिल्लीत अनेक ठिकाणी सुरू करण्यात आलेले मोहल्ला क्लिनिक, सरकारी शाळांचा सुधारलेला दर्जा, विजेच्या दरात झालेली कपात, सरकारी रुग्णालयांचा सुधारलेला कारभार या आधारे आम आदमी पक्ष या निवडणुकीत उतरल्याचे दिसून येते. आम आदमी पक्षाच्या प्रचाराची सारी दारोमदार मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर आहे. केजरीवाल पुन्हा निवडून येण्याचा चमत्कार करून दाखवितात की, त्यांना पराभवाचा सामना करावा लागतो, हेही योवळी दिसणार आहे. केजरीवाल यांना पुन्हा जनादेश मिळाल्यास सलग दुसर्‍यांदा मुख्यमंत्री होण्याचा मान त्यांना मिळणार आहे. दिल्लीतील लढत भाजप, आप व काँग्रेस या तीन पक्षांत होत असली तरी ती प्रामुख्याने आप व भाजप यांच्यातच होत असल्याचे दिसून येत आहे. काही मतदारसंघात काँग्रेस पक्ष लढत देण्याच्या स्थितीत असेल, असे म्हटले जाते.

@@AUTHORINFO_V1@@