नवीन वर्षात विजय मल्ल्याला पुन्हा एकदा मोठा धक्का!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-Jan-2020
Total Views |

vijay_1  H x W:



भारतातील मालमत्ता गेल्या आणि फ्रान्सस्थित मालमत्ताही होणार जप्त

नवी दिल्ली: भारतीय स्टेट बँकेसह विविध बँकांचे सुमारे ९ हजार कोटींचे कर्ज बुडवून विदेशात पसार झालेला उद्योगपती विजय मल्ल्याला नवीन वर्षात पुन्हा एकदा मोठा धक्का बसणार आहे. विजय मल्ल्याच्या भारतास्थित अनेक मालमत्तांवर जप्ती आलेली असतानाच मल्ल्याची फ्रान्समधील मालमत्ताही विकली जाणार आहे. मल्ल्याची फ्रान्समधील १७ खोल्यांचा बंगला, एक चित्रपट गृह, खासगी हेलिपॅड आणि नाइट क्लब आदी मालमत्ता विकली जाणार असून त्याच्यासाठी हा फार मोठा दणका असल्याचे बोलले जाते आहे.


मल्ल्याने गिज्मो इन्व्हेस्ट एसए या कंपनीच्या माध्यमातून ‘ले ग्रँड जर्दिन’ नावाचा बंगला खरेदी केला होता. या बंगल्यासाठी त्याने कतार नॅशनल बँकेची शाखा असलेल्या अंसबाचर अँड कंपनीकडून कर्ज घेऊन १४० कोटी रुपये खर्च केले होते. मात्र मल्ल्याची कंपनी कर्जाची परतफेड करण्यास अपयशी ठरल्याने बँकेने लंडनच्या कोर्टात खटला दाखल केला होता. मल्ल्याने त्याचा इंग्लंडमधील ५० मीटर सुपर यॉट विकावी आणि कर्जाची परतफेड करावी, अशी मागणी बँकेने कोर्टात केली आहे. २६ कोटीच्या लोन सेक्युरिटीसाठी मल्ल्याने ही बोट गहाण ठेवल्याचेही बँकेने कोर्टाच्या निदर्शनास आणून दिले आहे.

@@AUTHORINFO_V1@@