'संजय राऊत यांचा राहुल गांधींनाच अंदमानात जाण्याचा सल्ला' : रणजित सावरकर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-Jan-2020
Total Views |


RANJIT SAVARKAR_1 &n


मुंबई : स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न देण्यास विरोध करणाऱ्यांना दोन दिवसांसाठी अंदमानच्या तुरुंगात डांबायला हवे या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या वक्तव्याचे भारतीय जनता पक्ष आणि वीर सावरकरांचे नातू रणजीत सावरकर यांनी स्वागत केले आहे. " संजय राऊत यांनी वीर सावरकरांना विरोध करणाऱ्यांच्या बाबतीत केलेल्या वक्तव्याचे मी स्वागत करतो कारण हे वक्तव्य म्हणजे काँग्रेस नेते राहुल गांधी यांना दिलेला सल्लाच आहे." असे सावरकरांचे नातू रणजीत सावरकर यांनी म्हटले आहे.




पुढे ते म्हणाले
,"काँग्रेसचा वीर सावरकरांना विरोध असतानाही संजय राऊत यांनी हा सल्ला देण्याचे धाडस दाखवले त्याचे मी कौतुक करतो असेही रणजीत सावरकर म्हणाले आहेत. एका वृत्तसंस्थेला त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. शिवसेनेची भूमिका सावरकरांना पाठिंबा देणारी आहेच. आता येत्या काळात शिवसेना काँग्रेसचीही समजूत घालेल आणि त्यांना सांगेल की तुमचा सावरकर विरोध हा फुकाचा आहे तो बाजूला ठेवा", असे सूचक वक्तव्य रणजित सावरकर यांनी केले.



"
खासदार राऊत यांनी केलेल्या वक्तव्याचे आपण स्वागत करत असून त्यांनी म्हटल्याप्रमाणे काँग्रेसचे माजी अध्यक्ष, खासदार राहुल गांधी यांनाच अंदमानातील तुरुंगात पाठवावे लागेल", अशी प्रतिक्रिया भाजप नेते विनोद तावडे यांनी ही व्यक्त केली आहे.

@@AUTHORINFO_V1@@