सानिया मिर्झाचे टेनिस कोर्टवर जोरदार पुनरागमन!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-Jan-2020
Total Views |

sania_1  H x W:


दोन वर्षांनंतरही सानियाचा फॉर्म ‘जैसे थे’!

मुंबई : भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झाने तब्बल दोन वर्षांनी टेनिस कोर्टवर पाऊल ठेवले. दुहेरीचे अजिंक्यपद मिळवत जोरदार तिने पुनरागमन केले आहे. आई झाल्यानंतर तिचा हा पहिलाच सामना! सानियाने होबार्ट इंटरनॅशनल टूर्नामेंटच्या महिला दुहेरी स्पर्धेचे अजिंक्यपद पटकावले आहे. तब्बल दोन वर्षांनी सानिया मिर्झाने आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत पुनरागमन केले. सानियाचे हे दुहेरीमधले ४२ वे विजेतेपद ठरले.


युक्रेनची जोडीदार नादीया किचनॉकच्या साथीने सानियाने दुहेरीचे विजेतेपद पटकावले. अंतिम फेरीत सानिया-नादीया जोडीने चीनच्या शुई पेंग आणि शुई झँग जोडीचा ६-४
, ६-४ ने हरवत, अवघ्या १ तास २१ मिनिटांत सानिया-नादीया जोडीने हा सामना जिंकला.


या आधी
सानियाने २०१६चे ऑस्ट्रेलियन ओपनचे महिला दुहेरी आणि २००९चे मिश्र-दुहेरी स्पर्धेचे जेतेपदही पटकावले आहे. २०१७ मध्ये चीन ओपन स्पर्धेत सानियाने शेवटचा सामना खेळला होता.

@@AUTHORINFO_V1@@