निर्भयाच्या दोषींना तिच्या आईने माफ करावे : इंदिरा जयसिंह

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-Jan-2020
Total Views |
Nirbhaya Rape Case _1&nbs
 


नवी दिल्ली : निर्भया बलात्कार प्रकरणात गुन्हेगारांच्या फाशीच्या मुद्द्यावरून ज्येष्ठ वकील इंदिरा जयसिंह यांनी निर्भयाच्या आईला अजब सल्ला दिला आहे. निर्भयाच्या आईने काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांचे अनुकरण करावे, असा सल्ला त्यांनी निर्भयाच्या आईला दिला आहे.

 

निर्भया बलात्कार प्रकरणातील सर्व दोषींना १ फेब्रुवारी रोजी पहाटे सहा वाजता तिहार तुरुंगात फाशी दिली जाणार आहे. या संदर्भातले नवे डेथ वॉरंट दिल्ली उच्च न्यायालयाने जारी केले आहे. चौघांपैकी एक दोषी मुकेश सिंह याने दयेचा अर्ज केल्याने आधी ठरलेली २२ जानेवारी ही फाशीची तारीख पुढे गेली. शुक्रवारी राष्ट्रपतींनी त्याचा दयेजा अर्ज फेटाळला. चौघांना फाशीवर चढवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

 

शिक्षेला होत असलेल्या विलंबावर निर्भयाची आई आशा देवी यांनी संताप व्यक्त केला. आमच्या नशीबी न्याय नाही, फक्त तारखाच आल्या, अशी प्रतिक्रीया त्यांनी प्रसारमाध्यमांना दिली होती. या पार्श्वभूमीवर इंदिरा जयसिंह यांनी एक ट्विट केले आहे.

 

'आशा देवींचं दु:ख आणि वेदना मी समजू शकते. तरीही मी त्यांना सोनिया गांधी यांचे अनुकरण करायला हवे. सोनियांनी ज्याप्रमाणं त्यांचे पती राजीव गांधी यांच्या हत्याकांडातील दोषी नलिनीला माफ केले, आपण मृत्युदंडाच्या शिक्षेविरोधात असल्याचे सांगितले, तोच कित्ता आशा देवी यांनी गिरवावा,' असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. मी आशा देवी यांच्यासोबत आहोत, मात्र मृत्युदंडाच्या विरोधात आहोत,' असेही त्यांनी पुढे म्हटले आहे.




@@AUTHORINFO_V1@@