मी शाहीनबागेतून जीव वाचवून पळाले : डॉ. दीपा शर्मा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-Jan-2020
Total Views |

tweet _1  H x W

 
 

नवी दिल्ली : शाहीनबागेत घडलेल्या कथित शांततापूर्ण प्रकारानंतर भीम आर्मी प्रमुख चंद्रशेखर आझाद रावण याला जामीन मिळाल्यानंतर या परिसरात घडणाऱ्या अमानुष कृत्यांचा एकएक भाग उघड होत आहे. जयपूर येथे राहणाऱ्या डॉ. दीपा शर्मा या आंदोलनात पोहोचल्यानंतर त्यांना जमावाने घेरून त्यांच्याशी केलेल्या वर्तणूकीमुळे त्यांना आपला जीव मुठीत घेऊन तिथून पळ काढावा लागला. 'मी घरी जीवंत पोहोचूच शकली नसती', असा थरारक अनुभव त्यांनी या भागातून सुटका केल्यावर व्यक्त केला आहे.

 

१६ जानेवारी २०२० रोजी डॉ. दीपा शर्मा या पेशाने डॉक्टर असून जयपूर येथे राहणाऱ्या आहेत. शाहीनबागेतील आंदोलकांचे म्हणणे जाणून घेण्यासाठी आणि कॅमेऱ्यात टीपण्यासाठी त्या घरच्यांना न सांगता तिथे पोहोचल्या. त्यांच्या मित्रमंडळींनी तिथे न जाण्याचा सल्ला त्यांना दिला होता. मात्र, तरीही हा विरोध डावलून आंदोलकांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी त्या तिथे पोहोचल्या होत्या.

 

१६ जानेवारीला सायंकाळी मेट्रोद्वारे शाहीनबागेत त्यांनी कसाबसा प्रवेश मिळवला होता. तिथल्या आंदोलकांपैकी एका वयोवृद्ध व्यक्तीशी बोलून त्यांनी त्यांच्याच परवानगीने एक व्हीडिओ तयार केला होता. मात्र, काहीवेळातच निदर्शन करणाऱ्यांपैकी एका जमावाने त्यांना घेरले. 'तुम्ही काढलेला व्हीडिओ डिलीट करा तरच तुम्हाला इथून जाऊ देऊ', अशी धमकी त्यांना दिली. मात्र, डॉ. शर्मा यांनी याला नकार दिला. हे ऐकून जमाव आणखीच आक्रमक झाला. त्यांनी त्यांच्याशी बाचाबाची सुरू केली. तुमचे प्रेसकार्ड दाखवा, तुमचे ओळखपत्र दाखवा, अशी उलटतपासणी त्यांनी सुरू केली.



 

या प्रकाराने डॉ. शर्मा पुरत्या घाबरून गेल्या. आपण एक डॉक्टर असून आपल्याकडे कुठले प्रेसकार्ड नसल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, जमावाने ऐकून न घेता. त्यांच्याशी वाद सुरूच ठेवला. इतक्या मोठ्या जमावाने घेरल्याने शर्मा यांना तिथून पळ काढण्याशिवाय दुसरा पर्याय कथित आंदोलकांनी ठेवला नाही. या जमावाला चकवा देऊन त्यांनी पळ काढला. घडल्या प्रकाराचा अनुभव त्यांनी ट्विटरद्वारे शेअर केला आहे.
 

दिल्लीतील शाहिनबाग परिसरात सुरू असलेल्या आंदोलनामुळे नागरिकांना दैनंदिन व्यवहारात अडथळे निर्माण होत आहेत. दररोज सायंकाळच्या सुमारास वाहतूकीवर परिणाम जाणवत आहे. स्थानिकांनी आंदोलकांवर आरोप लावत दंगा करण्यासाठीच हे आंदोलन सुरू असल्याचे त्यांनी म्हटले आहे. इथले बहुतांश आंदोलनकर्ते हे स्थानिक नसून पिकनिक साजरी करण्यासाठी आणि फिरण्यासाठी इथे आले असल्याचे त्यांनी म्हटले आहे.





@@AUTHORINFO_V1@@