‘अॅमेझॉन’ देणार १० लाख भारतीयांना रोजगार!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-Jan-2020
Total Views |

 

amazon_1  H x W



अॅमेझॉन भारतात करणार १ अब्ज अमेरिकी डॉलर्सची गुंतवणूक


नवी दिल्ली : अॅमेझॉनने येत्या पाच वर्षांच्या कालावधीत भारतात १ अब्ज अमेरिकी डॉलरची गुंतवणूक करण्याची घोषणा केल्यानंतर रोजगारनिर्मितीबाबत आता महत्त्वाची घोषणा केली आहे. भारतात येत्या ५ वर्षांत अॅमेझॉनतर्फे १० लाख नवे रोजगार निर्माण केले जातील, असे अॅमेझॉनचे सीईओ जेफ बेझोस यांनी त्यांच्या भारत दौऱ्यादरम्यान सांगितले. अॅमेझॉनकडून तंत्रज्ञान, पायाभूत सुविधा व दळणवळण क्षेत्रात होणाऱ्या गुंतवणुकीच्या माध्यमातून हे रोजगार उपलब्ध होतील, असे ते म्हणाले. अॅमेझॉनने गेल्या ६ वर्षांच्या कालावधीत भारतात ७ लाख रोजगार निर्माण केले आहेत.


आमच्या कंपनीच्या व्यवसायात येथील कर्मचाऱ्यांचे अमूल्य योगदान आहे. आमच्याशी जोडल्या गेलेल्या लहान व्यावसायिकांनी असामान्य सृजन दाखवले आहे. तसेच
, आमच्या मंचावरून विकल्या जाणाऱ्या उत्पादनांना येथील ग्राहकांनी भरभरून प्रतिसाद दिल्यामुळे येथे भविष्यात व्यवसायविस्तार करण्याचे उद्दिष्ट कंपनीने आखले असून त्यातून स्थानिक तरुणांना रोजगार व देशी व्यावसायिकांना बाजार उपलब्ध होईल, असे बेझोस म्हणाले.

@@AUTHORINFO_V1@@