‘मुंबई-पुणे हायपर लूप’ प्रकल्प रद्द होणार?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-Jan-2020
Total Views |

ajit_1  H x W:



उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांचा मुंबई-पुणे हायपरलूपला विरोध

मुंबई : 'हायपर लूप हा प्रकल्प जगात कोठेही झालेला नाही. आधी जगात हा प्रकल्प होऊ दे. पुणे-मुंबई या मार्गासाठी आपल्यावर प्रयोग कशाला? हा प्रकल्प परवडणारा नाही,' असे वक्तव्य करत राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी ‘मुंबई-पुणे हायपर लूप’ प्रकल्पाला विरोध दर्शवला. पुणे आणि मुंबई ही दोन्ही शहरे हायपर लूप तंत्रज्ञानाने जोडल्यास अवघ्या १४ मिनिटांमध्ये प्रवास होऊ शकणारा हा स्वप्नवत प्रकल्प असून, तो रद्द करण्याचे संकेत पवार यांनी शुक्रवारी दिले.


माजी मुख्यमंत्री फडणवीस यांनी सुमारे पाच हजार कोटी रुपयांचा प्रकल्प आखला होता. त्यासाठी करारही करण्यात आला होता. मात्र
, हा प्रकल्प गुंडाळण्यात येणार असल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी सूचित केले आहे. पवार म्हणाले, 'जगामध्ये कोठेही हायपर लूप प्रकल्प झालेला नाही. अगोदर जगात कुठे तरी हा प्रकल्प होऊ दे. तेथे यशस्वी झाल्यावर आपण या प्रकल्पाचा विचार करू शकतो. या प्रकल्पाची ट्रायल घेण्याचीही आपली आर्थिक क्षमता नाही.'


'पुणे-मुंबई घाटमार्गातील वाहतूक सुरळीत होण्यासाठी बोगदा तयार करण्याचे काम सुरू आहे. हा बोगदा उपलब्ध झाल्यावर वाहतूक सुरळीत होऊ शकणार आहे. त्यामुळे हायपर लूप प्रकल्पाबाबत विचार करावा लागणार आहे,' असेही पवार म्हणाले.

@@AUTHORINFO_V1@@