'त्या' नराधमांना अखेर फाशी होणारच !

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Jan-2020
Total Views |


nirbhaya_1  H x


नवी दिल्ली : निर्भया बलात्कार प्रकरणातल्या दोषींना १ फेब्रुवारी रोजी सकाळी ६ वाजता फाशी देण्यात येणार आहे. या संदर्भात दिल्ली कोर्टाने नवीन डेथ वॉरंट जारी केले आहे. दिल्ली कोर्टाने आधी दिलेल्या डेथ वॉरंटनुसार २२ जानेवारीला निर्भयाच्या दोषींना फासावर लटकवण्यात येणार होते. मात्र डेथ वॉरंटला आव्हान देण्यात आले ज्यानंतर २२ तारखेचे डेथ वॉरंट रद्द करण्यात आले होते. आता दिल्ली न्यायालयाने नवे डेथ वॉरंट जारी केली आहे. या प्रकरणातील चार आरोपींपैकी एक असलेल्या मुकेश याने राष्ट्रपतींकडे केलेला दयेचा अर्ज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी फेटाळला आहे.


यासंदर्भातील माहिती केंद्रीय गृह मंत्रालयाने दिली. मात्र २२ तारखेला फाशी दिली जाणार नाही हे तेव्हा स्पष्ट झाले होते. कारण राष्ट्रपतींनी दयेचा अर्ज फेटाळल्यानंतर नव्याने डेथ वॉरंट जारी करण्यासाठी किमान १४ दिवसांचा अवधी द्यावा लागतो असा दावा आरोपींच्या वकिलांनी केला होता. आता कोर्टाने नवे डेथ वॉरंट काढून १ फेब्रुवारी रोजी सकाळी ६ वाजता निर्भयाच्या दोषींना फाशी दिली जाईल असा निर्णय दिला आहे.

@@AUTHORINFO_V1@@