अहमदाबाद- मुंबई तेजस एक्सप्रेसचे लोकार्पण

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Jan-2020
Total Views |


dsgf_1  H x W:

 

नवी दिल्ली : अहमदाबाद- मुंबई दरम्यान धावणाऱ्या तेजस एक्सप्रेसचे शुक्रवारी लोकार्पण होणार आहे. ही खासगी रेल्वे असून तिच्यामध्ये अत्याधुनिक सुविधा देण्यात आल्या आहेत. गुजरातमधील अहमदाबाद येथून तेजस एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवण्यात आला.

 
 
 
 

१९ तारखेपासून रेल्वे अहमदाबाद- मुंबई दरम्यान नियमित धावणार आहे. प्रवाशांना आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावर या रेल्वेचे बुकिंग करता येणार आहे. तेजस एक्सप्रेसमध्ये अत्याधुनिक सुविधा देण्यात आल्या आहेत. 'व्हीआयपी' डब्यांमध्ये प्रत्येक सीटला एलईटी स्क्रिन लावण्यात आली आहे, तसेच वायफाय सुविधाही देण्यात आली आहे. तेजस एक्सप्रेस ताशी १६० कि.मी वेगाने धावणार आहे.

@@AUTHORINFO_V1@@