गांधी घराण्याला स्वातंत्र्यवीर सावरकर काय माहिती ? : विक्रम गोखले

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Jan-2020
Total Views |


vikram gokhale _1 &n



योगेश सोमण यांच्यावरील कारवाईच राज्य सरकारने उत्तर द्यावं : विक्रम गोखले

मुंबई : 'स्वातंत्र्यवीर सावरकरांचे चित्र संसदेतून काढा असे म्हणणाऱ्या सोनिया गांधी यांना काय माहिती सावरकर ? त्यांना काय अधिकार आहे असे म्हणण्याचा. त्यांनी किती वाचले आहे स्वा. सावरकरांबद्दल? हे सांगावे. राहुल गांधी यांना काय माहिती स्वा. सावरकरांबद्दल? हे त्यांनी सांगावे, असा सवाल विक्रम गोखले यांनी गांधी घराण्याला विचारला. पुढे ते म्हणाले, "जेव्हा एकमेकांची तोंड ही न पाहणारे विरोधक एकत्र येतात तेव्हा समजावं कि राजा काहीतरी चांगलं काम करत आहे. हे चाणक्याचे वाक्य हे माझं नाही." असे म्हणत त्यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला. योगेश सोमण यांना सक्तीच्या रजेवर का पाठवले? याचे उत्तर सध्याच्या राज्य सरकारने द्यावे, अशा तीव्र शब्दात ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी ठाकरे सरकारचा निषेध केला. नाट्यशास्त्राबद्दल सोमण यांनी काही म्हटले असेल तर तो त्यांचा अधिकार आहे. सध्या जे काही चालल आहे ते अतिशय वाईट आहे, अशा शब्दांत त्यांनी नाराजी व्यक्त केली. पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ते बोलत होते.




काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर टीका केल्यामुळे सोमण यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे. सोमण यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून एक व्हिडिओ पोस्ट करत राहुल गांधी आणि माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यावर टीका केली होती. परिणामी त्यांच्यावर ही रजेची कारवाई केली गेली. ज्याचा निषेध गोखले यांनी केला.ते म्हणाले
,"राजकीय फायद्यासाठी स्वा.सावरकर, कोंडदेव, रामदास स्वामी यांच्याबद्दलचे वाद निर्माण केले जातात. राहुल गांधींसारख्यांना स्वा.सावरकर कळले नाहीत. त्यांना स्वा.सावरकरांवर बोलण्याचा अधिकार नाही. स्वा. सावरकरमहात्मा गांधी ही माणसे होती. माणसाकडून चूक होऊ शकते, हे स्वीकारा. विचारसरणीवर आधारित भेदभाव हा सिने क्षेत्रासाठी हानिकारक ठरणार आहे", असे सूचक वक्तव्य ही गोखले यांनी केले. तसेच योगेश सोमण यांच्यावर झालेल्या कारवाईचे उत्तर महाराष्ट्र सरकारने द्यावे, असेही ते म्हणाले.

@@AUTHORINFO_V1@@