काँग्रेसच्या खडसावण्याने राऊतांची सपशेल माघार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Jan-2020
Total Views |


raut_1  H x W:



मुंबई : 'इंदिरा गांधी यांच्याबद्दल मी केलेल्या वक्तव्यामुळे कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी वक्तव्य मागे घेतो,' असे म्हणत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी माजी दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याबद्दल केलेल्या वक्त्यव्यावरून माघार घेतली आहे.


दरम्यान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी सकाळीच माध्यमांशी बोलताना नाराजी व्यक्त करत
, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलेलं वक्तव्य चुकीचेच होते असे सांगत अशी वक्तव्ये यापुढे कुणाकडूनही खपवून घेतली जाणार नाहीत असे म्हणत संजय राऊतांना खडसावले होते. त्यानंतरच खासदार संजय राऊत यांनी आपले वक्तव्य मागे घेतले. महाविकास आघाडीमध्ये बिघाडी निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन त्यांनी माघार घेतली आहे, अशी चर्चा आता रंगू लागली आहे.



संजय राऊत यांनी एका जाहीर कार्यक्रमात करीम लालाला भेटण्यासाठी माजी दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी येत असत असे वक्तव्य केले होते. या वक्तव्यावरुन वाद निर्माण झाला. काँग्रेस नेते हे संजय राऊत यांच्यावर नाराज झाले व या नाराजीचे पडसाद महाविकास आघाडी सरकारवर दिसू नये म्हणून १५ तारखेला म्हणजेच बुधवारी करण्यात आलेले वक्तव्य आज संजय राऊत यांना मागे घ्यावे लागले.



@@AUTHORINFO_V1@@