महाराष्ट्रातून टीकेनंतर संजय राऊतांची सारवासारव

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Jan-2020
Total Views |

sanjay_1  H x W



संपूर्ण महाराष्ट्रच छत्रपती शिवाजी महाराजांचा वंशज असल्याचे म्हणत या वादावर पडदा टाकण्याचा केला प्रयत्न


मुंबई :
शिवसेना खासदार संजय राऊतांनी उदयनराजेंबाबत केलेल्या वक्तव्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातून त्यांच्यावर टीका केली जात आहे. हा वाद पेटत असल्याचे दिसताच संजय राऊतांनी या वक्तव्यावर सारवासारव केली आहे. सातारा आणि कोल्हापूरच्या गादीचा नेहमीच आदर करत आलो आहोत. मात्र, सारा महाराष्ट्रच छत्रपती शिवाजी महाराजांचा वंशज असल्याचे म्हणत त्यांनी या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. शिवाजी महाराजांवर देशाच्या सर्व नागरिकांचा अधिकार आहे, त्यांची प्रेरणा सगळ्यांमध्येच आहे, असेही संजय राऊत यांनी म्हणाले. छत्रपती शिवाजी महाराज हा इतिहास आहे, महाराष्ट्राची जनता हेच महाराजांचे वंशज आहेत, असेही संजय राऊत यांनी म्हटले.


'छत्रपतींचे वंशज म्हणून आम्ही तुमचा आदर करतो. पण तंगड्या तोडण्याची भाषा योग्य नाही. तंगड्या प्रत्येकाला असतात,' से राऊत यांनी उदयनराजेंना सुनावले आहे. मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत राऊत यांनी आपली भूमिका मांडली. 'छत्रपतींच्या घराण्याबद्दल आम्हाला कायम आदर आहे. या घराण्यातील अनेक लोक शिवसेनेशी जोडलेले होते. कोल्हापूरचे संभाजीराजे, साताऱ्याचे शिवेंद्रराजे ही सगळी संयमी व्यक्तिमत्त्वं आहेत. उदयनराजेंच्या मातोश्री कल्पनाराजे भोसले या तर शिवसेनेतच होत्या. शिवसेनेचे सर्वांशीच जवळचे संबंध राहिले आहेत. पण कुणी एखाद्या घराण्यात जन्मला म्हणून त्यांना महाराष्ट्रातील इतर श्रद्धास्थानांवर बोलण्याचा अधिकार मिळत नाही. शिवसेना, बाळासाहेब ठाकरे, शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्याबद्दल कुणी काहीही बोलत असेल तर त्यांना उत्तर द्यायचा अधिकार आम्हाला आहे,' से ते यावेळी म्हणाले.


'आज के शिवाजी- नरेंद्र मोदी' पुस्तकावरून सुरू झालेल्या वादावर छत्रपती शिवरायांच्या वंशजांनी प्रतिक्रिया द्यावी, अ
से संजय राऊत यांनी आव्हान दिले होते. त्यावर भाजपचे माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी राऊतांवर 'बिनपट्ट्याचा' म्हणत खिल्ली उडवण्याचा प्रयत्न केला होता. तसेच शिवसेना, शिववडा हे नाव ठेवताना शिवरायांच्या वंशजांची परवानगी घेतली होती का? असाही प्रश्न विचारला होता. यावर, प्रतिक्रिया देताना एका जाहीर मुलाखतीत संजय राऊत यांनी 'वंशज असल्याचे पुरावे घेऊन यावेत' असा टोला लगावला होता. त्यानंतर हा वाद निर्माण झाला.

@@AUTHORINFO_V1@@