पाकिस्तानकडून काढले आशियाई कपचे यजमानपद ; बीसीसीआयचा होता निषेध

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Jan-2020
Total Views |


saf_1  H x W: 0


नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तानमधील चालू असलेल्या तणावाचा फटका पुन्हा एका पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला बसला आहे. नुकतेच, बीसीसीआयच्या तीव्र निषेधानंतर आशियाई क्रिकेट असोसिएशनने पाकिस्तानकडून आशिया चषक २०२० स्पर्धेचे यजमानपद काढून घेण्याचा निर्णय घेतला आहे. आधीच्या आशिया कपच्या वेळापत्रकानुसार ही स्पर्धा सप्टेंबर महिन्यात पाकिस्तानमध्ये होणार होती. पण, आता ती स्पर्धा दुबई, बांगलादेश किंवा श्रीलंका यापैकी एका देशात आयोजित करण्याचा विचार करण्यात येत आहे.

 

बीसीसीआयने सुरक्षेचे कारण देत पाकिस्तानामध्ये न खेळण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे त्यांनी स्पर्धेतून माघार घेण्याचेही घोषणादेखील केली होती. त्यामुळे अखेर पाकिस्तानमधून हि स्पर्धा हलवण्यात आली आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील राजकीय संबंध पाहता, या स्पर्धेवर प्रश्नचिन्ह सुरुवातीपासूनच उपस्थित केले जात होते. यंदा आशिया चषक हा टी-२० फॉरमॅटमध्ये खेळवण्यात येणार आहे.

@@AUTHORINFO_V1@@