टक्केखोर लोकप्रतिनिधींना गडकरींचा दणका

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Jan-2020
Total Views |

gadkari_1  H x



नवी दिल्ली : रस्तेबांधणीच्या कामात ठेकेदारांकडून टक्केवारीची मागणी करणाऱ्या आमदार आणि खासदारांनी केंद्रीय रस्तेबांधणी व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी जोरदार दणका दिला आहे. विदर्भ, मराठवाडा, कोकण आणि पुणे विभागातील अशा जवळपास २२ लोकप्रतिनीधींची यादी गडकरी यांनी केंद्रीय अन्वेषण विभाग अर्थात सीबीआयकडे लेखी तक्रार केली असून त्यावर लवकरच कारवाई केली जाणार असल्याचे समजते.



मिळालेल्या माहितीनुसार
, नितीन गडकरी यांनी १२ पेक्षा अधिक आमदार आणि ७ पेक्षा अधिक खासदार अशा जवळपास २२ जणाची नावे सीबीआय संचालकांकडे दिली असून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यासंबंधी सांगितले आहे. सीबीआयच्या संचालकांना आपल्या कार्यालयात पाचारण करून गडकरी यांनी टक्केकोर लोकप्रतिनिधींची नावे त्यांच्याकडे सोपविल्याचे समजते. यादीमध्ये विदर्भ, मराठवाडा, कोकण आणि पुणे विभागातील लोकप्रतिनिधींचा समावेश असल्याचे कळते. याप्रकरणी कठोर कारवाई होण्याची शक्यता असून रस्तेबांधणीच्या कामात टक्केवारी मागणाऱ्या लोकप्रतिनिधींना यामुळे मोठा दणका बसणार आहे.



केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी काही दिवसांपूर्वी काही आमदार आणि खासदार यांच्या टक्केखोरीविषयी वक्तव्य केले होते. रस्तेबांधणीचे काम सुरू होण्यापूर्वी की आमदार आणि खासदार संबंधित ठेकेदारास त्यांना भेटावयास सांगतात, त्याला विनाकारण त्रास देणे, टक्केवारीची मागणी करणे असे प्रकार करीत असतात. मराठवाड्यातही असे प्रकार सुरू आहेत, असे गडकरी यांनी १२ जानेवारी रोजी औरंगाबाद येथे एका कार्यक्रमात सांगितले होते. त्यानंतर या विषयाची गंभीर दखल घेतली असल्याचेही गडकरी यांनी म्हटले होते.

@@AUTHORINFO_V1@@