संजय राऊतांची पिसाळलेल्या कुत्र्याशी तुलना!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Jan-2020
Total Views |

sanjay_1  H x W


माजी खासदार निलेश राणेंची संजय राऊतांवर सडकून टीका


मुंबई : बुधवारी पुण्यामधील एका कार्यक्रमामध्ये संजय राऊत यांनी दाऊद इब्राहिमला दम दिल्याचे म्हटले होते. त्यावरुनच भाजपचे नेते व माजी खासदार निलेश राणे यांनी आता राऊतांवर टीका करत त्यांची तुलना थेट पिसाळलेल्या कुत्र्यासोबत केली आहे.


संजय राऊतांनी पुण्यामध्ये पार पडलेल्या एका कार्यक्रमात पत्रकारितेतील आपल्या कारकिर्दीबद्दल बोलताना, दाऊद इब्राहिमपासून अनेकांचे मी फोटो काढले आहेत. मी दाऊद इब्राहिमला दम देखील दिला असल्याचे म्हणाले. त्याचबरोबर माझी बाळासाहेब ठाकरे फायर ब्रँड एडिटर अशी अनेक ओळख करून द्यायचे, अशी आठवणही यावेळी राऊत म्हणाले होते.





यावर निलेश राणेंनी ट्विट करत राऊतांवर टीका केली. ते आपल्या ट्विटमध्ये म्हणतात
, ‘मी दाऊद इब्राहिमलाही दम दिला आहे,’ हे संजय राऊतांचे वक्तव्य म्हणजे चांगला विनोद असल्याचा टोला निलेश राणे यांनी लगावला आहे. खूप दिवसांनी चांगला जोक वाचला. मला माहित नाही नवीन कायदा काय आहे पण पिसाळलेल्या कुत्र्याला गोळी मारायचा नियम असता तर संज्या संपला असता. संज्या सारखा लुक्का दाऊदला दम भरायला लागला म्हणून दाऊद संपला. संज्या आताच्या आता पाकिस्तानात दम भरायला सुरू कर असे म्हटले आहे.’




याचवेळी त्यांनी उद्धव ठाकरेंवरही टीका केली. छत्रपतींच्या वंशजांनी पुरावे द्यावेत या संजय राऊत यांच्या वक्तव्याविरोधात उदयनराजेंना समर्थन देत निलेश राणेंनी, ‘आदरणीय उदयनराजेंनी पुरावे द्यायची काही गरज नाही
, आम्हाला कळत नाही उद्धव ठाकरे तर कुठल्याच ठाकरे सारखा दिसत नाही पण आम्ही कधीही बोललो नाही की त्यांना रस्त्यावरून आणले काय??’ असे ट्विट करत संजय राऊतांच्या या वक्तव्याचा देखील समाचार घेतला.

@@AUTHORINFO_V1@@