म्हणून मोदींनी नाकारली 'अॅमेझॉन' फाऊंडर बेजोस यांची भेट

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Jan-2020
Total Views |
Narendra Modi _1 &nb
 



नवी दिल्ली : अॅमेझॉनचे फाउंडर आणि सीईओ जेफ बेजोस यांच्या भारत दौऱ्याचा गुरुवारी शेवटचा दिवस आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी बेजोस यांना भेटण्याची शक्यता आता धूसर आहे. यामागील प्रमुख कारण म्हणजे, कॉम्पिटीशन कमीशन ऑफ इंडिया (सीसीआय) अॅमेझॉनविरोधात चौकशी करत आहे.

 

यामुळेच ही भेट नाकारली जाण्याची शक्यता जास्त व्यक्त करण्यात येत होती. तसेच वॉशिंग्टन पोस्ट या बेजोस यांच्याच मालकीच्या वृत्तपत्रातून वेळोवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीकास्त्र डागले जाते. मोदींना ग्लोबल गोल किपर पुरस्कार मिळाल्यानंतरही या वृत्तपत्रातून टीका करण्यात आली होती. यामुळेच मोदी बेजोस यांची भेट होणार नसल्याचे स्पष्ट आहे.

 

बेजोस यांनी मोदींशी भेट व्हावी यासाठी वेळ मागितली होती. यापूर्वी बुधवारी त्यांनी भारताचे कौतूक केले होते. २१वे शतक हे भारताचे असून येता काळ हा भारतीय बाजारपेठेसाठी उत्तम असल्याचे मत व्यक्त केले होते. याच पार्श्वभूमीवर भारतीय बनावटींच्या वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध करून देणार असल्याचीही घोषणा केली होती. मात्र, 'अॅमेझॉन'बद्दल सुरू असलेल्या चौकशीमुळेच ही भेट टळली असल्याचे सांगण्यात येत आहे. दिवसभरच्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ग्लोबलासिंग इंडियन थॉट्स या कार्यक्रमाला संबोधित केले आहे.

@@AUTHORINFO_V1@@