नव्या करार यादीत धोनीला डावलले?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Jan-2020
Total Views |


saf_1  H x W: 0


भारताचा कर्णधार विराट कोहली मात्र मालामाल


नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने नुकतेच नवीन करार यादी जाहीर केली. परंतु, यामध्ये भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनीचे नावच नसल्याने अनेक चर्चांना उधाण आले आहे. या नव्या करार यादीत धोनीचे नाव कुठल्याच श्रेणीमध्ये नसल्यामुळे अनेक प्रश्न उभे राहिले आहेत. बीसीसीआयने २०१९-२० या वर्षासाठी क्रिकेटपटूंसोबतचे करार जाहीर केले आहेत.

 
 
 

ऑक्टोबर २०१९ ते सप्टेंबर २०२० या कालावधीसाठी क्रिकेटपटूंना देण्यात येणारे मानधन बीसीसीआयने जाहीर केले. क्रिकेटपटूंना देण्यात येणाऱ्या मानधनाचे ग्रेड 'ए प्लस', 'ए', 'बी' आणि 'सी' असे चार प्रकार करण्यात आले आहेत. 'ए प्लस'मध्ये असलेल्या क्रिकेटपटूंना ७ कोटी, 'ए' ग्रेडमधील खेळाडूंना ५ कोटी, 'बी' ग्रेडमधील खेळाडूंना ३ कोटी तर अखेरच्या 'ग्रेड सी'मधील खेळाडूंना १ कोटी मानधन दिले जाईल.

@@AUTHORINFO_V1@@