'संजय राऊत म्हणजे अव्वल नंबरचे थापाडे...' आता मनसेचाही हल्लाबोल

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Jan-2020
Total Views |


asf_1  H x W: 0


मुंबई : शिवसेना खासदार आणि 'सामना'चे संपादक संजय राऊत यांच्या अनेक वक्तव्यांनी राज्यासह देशभरात खळबळ माजली. विरोधी पक्षच नव्हे तर त्यांच्या स्वतःच्या मित्रपक्षांमधूनही टीका होऊ लागली. भाजप, काँग्रेस यांच्याकडून टीका होत असताना आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांनीदेखील 'संजय राऊत हे एक नंबरचे थापाडे आहेत' अशी टीका केली आहे.

 

बुधवारी पुण्यात झालेल्या कार्यक्रमामध्ये शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी राज ठाकरेंच्या समर्थकांनी आपली गाडी जाळली होती असे वक्तव्य केले होते. त्याच पार्श्वभूमीवर देशपांडे यांनी एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये राऊतांवर टीका केली. "संजय राऊत हे एक नंबरचे थापाडे आहेत. राज ठाकरे यांनीच संजय राऊत यांना 'सामना'मध्ये घेऊन आले. जर राज ठाकरे यांनी जर त्यांना 'सामना'मध्ये आणले नसते तर आज राऊत कुठेतरी कारकुनी करत असते." अशा शब्दांमध्ये त्यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे.

 

पुढे देशपांडे यांनी पुढे सांगितले की , "संजय राऊत यांना आता तिन्ही पक्षांचे सरकार आल्यानंतर काही काम उरलेले नाही. त्यामुळे काहीतरी वक्तव्ये करुन चर्चेत रहायचे म्हणून ते अशी वक्तव्ये करत आहेत. ज्या मनसे सैनिकांनी तुमची गाडी जाळली होती त्यांचा आम्हाला अभिमान आहे. या घटनेनंतर राज ठाकरेंकडून त्यांनी नवी कोरी गाडी घेतली होती," असा खुमखुमीत टोला त्यांनी लगावला.

 

काय म्हणाले होते संजय राऊत?

 

बुधवारी संजय राऊत यांनी एक किस्सा सांगताना मनसेच्या कार्यकर्त्यांनी गाडीवर हल्ला केला होता असे विधान केले होते. "राज ठाकरे माझे चांगले मित्र आहेत. ते शिवसेना सोडून गेले तेव्हा मी त्यांची समजूत काढण्यासाठी गेलो होतो. मात्र त्यावेळी काहीजणांना राग आला. त्यांनी मला विरोध केला. राज यांच्या घराखाली माझी गाडी फोडली." असे त्यांनी सांगितले होते.

@@AUTHORINFO_V1@@