कलम ३७० हटवणे हे ऐतिहासिक पाऊल : लष्करप्रमुख

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Jan-2020
Total Views |


saf_1  H x W: 0

 

 

नवी दिल्ली : बुधवारी मकर संक्रांतीसोबतच देशभरामध्ये भारतीय लष्कर दिन साजरा करण्यात आला. यावेळी ७२ व्या सैन्य दिवसाच्या कार्यक्रमामध्ये नवनियुक्त लष्करप्रमुख मनोज नरवणे यांनी लष्कराच्या भविष्यातील योजना, दहशतवाद आदींसह अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. यावेळी त्यांनी जम्मू काश्मीरमधील कलम ३७० हटवणे हा ऐतिहासिक निर्णय असल्याचे सांगिलते. यामुळे इतर राज्यांप्रमाणे जम्मू काश्मीर या राज्याला मुख्य प्रवाहात येण्यास मदत होईल. 

 

"जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचे दर्जा देणारे कलम ३७० हटवणे हे एक ऐतिहासिक पाऊल आहे. यामुळे जम्मू-काश्मीर संपूर्ण भारताशी जोडले जाणार आहे. त्याचप्रमाणे या निर्णयामुळे पश्चिमेकडच्या शेजाऱ्यांच्या ज्या योजना आहेत त्यावर परिणाम झाला आहे." असे म्हणत त्यांनी पाकिस्तानवरही अप्रत्यक्षपणे निशाणा साधला.

 

"युद्ध करण्यासाठी भारतीय लष्कर सदैव तयार"

 

'भारतीय लष्कर हे झीरो टॉलरन्सच्या नीतीवर चालते आणि दहशतवादाला सडेतोड प्रत्युत्तर देण्यासाठी भारतीय लष्कराकडे अनेक पर्याय आहेत,' असे म्हणत त्यांनी पाकिस्तानला तंबी दिली. “भारतीय लष्कर नेहमीच सतर्क असते. आमचे जागतिक घडामोडींवर लक्ष आहे. दहशतवाद आणि शेजारी देशातून होणारी घुसखोरी खपवून न घेण्याच्या धोरणावर आम्ही ठाम आहेत. दहशतवादाचा सामना करण्यासाठी अनेक पर्याय आहेत. तसेच, आम्ही कुठल्याही आव्हानाचा सामना करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत." असे लष्करप्रमुख नरवणे यांनी आत्मविश्वासाने सांगितले.  

 
@@AUTHORINFO_V1@@