तरनजितसिंग संधू हे अमेरिकतील भारताचे नवे राजदूत

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Jan-2020
Total Views |


taranjeetsing _1 &nb


नवी दिल्ली : ज्येष्ठ राजदूत तरणजितसिंग संधू यांची अमेरिकेतील भारताचे नवे राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ते सध्या श्रीलंकेत भारताचे राजदूत आहेत. तरनजितसिंग संधू हे अमेरिकेत हर्षवर्धन श्रृंगलाची जागा घेतील. हर्षवर्धन श्रृंगला यांची भारतीचे परराष्ट्र सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. श्रीलंका येथे रुजू होण्यापूर्वी तरणजितसिंग संधू हे वॉशिंग्टन येथील भारतीय दूतावासामध्ये मिशनचे 'डेप्युटी चीफ ऑफ मिशन' देखील होते.



त्यांनी सप्टेंबर २०११ ते जुलै २०१३ या कालावधीत फ्रँकफर्टमध्ये भारतीय वाणिज्य दूत म्हणून काम केले आहे. संधू यांनी मार्च २००९ ते ऑगस्ट २०११ पर्यंत परराष्ट्र मंत्रालयात सहसचिव (संयुक्त राष्ट्र) आणि नंतर मानव संसाधन विभागात संयुक्त सचिव (प्रशासन) म्हणून काम पाहिले आहे. या व्यतिरिक्त त्यांनी जुलै२००५ ते फेब्रुवारी २००८ याकाळात संयुक्त राष्ट्र संघात भारताच्या कायमस्वरूपी मिशनमध्ये काम केले आहे.

@@AUTHORINFO_V1@@