"छत्रपतींच्या घराण्यात जन्मलो हे संपूर्ण महाराष्ट्राला माहित आहे" - शिवेंद्रराजे

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Jan-2020
Total Views |


saf_1  H x W: 0


मुंबई : गेले काही दिवस छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर चाललेल्या राजकारणावर आता पुन्हा एकदा संजय राऊत यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज उदयनराजे भोसले यांच्याबद्दल गंभीर विधान केले. छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज असल्याचे पुरावे घेऊन या, असे आव्हान संजय राऊत यांनी उदयनराजेंना दिले. यावर आता भाजप नेते आणि उदयनराजेंचे बंधू शिवेंद्रराजे भोसले यांनी आक्रमक पवित्र घेत त्यांची बाजू लढवली आहे.

 

संजय राऊत यांच्या आव्हानानंतर भाजप नेते शिवेंद्रराजे भोसले यांनी उत्तर दिले. "छत्रपती शिवाजी महाराजच्या घराण्यात जन्माला आलो हे संपूर्ण महाराष्ट्राला माहित आहे. त्यामुळे शिवाजी महाराजांचे वंशज असल्याचा काय पुरावा द्यावा? हे संजय राऊत यांनीच सांगावे." अशा शब्दात त्यांनी संजय राऊतांवर टीका केली. तसेच, "मी, उदयनराजे किंवा संभाजीराजे आम्ही काही बोललो नव्हतो. संजय राऊत यांनीच हा वाद सुरु केला होता. त्यामुळे आता संजय राऊत यांनीच वाद संपवावा." असे आव्हानही त्यांनी संजय राऊत यांना केले आहे.

@@AUTHORINFO_V1@@