भारत कोणत्याही मुद्द्यावर पळवाटा शोधत नाही तर थेट निर्णय घेतो : एस जयशंकर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Jan-2020
Total Views |


raisina_1  H x



नवी दिल्ली : परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी बुधवारी रायसीना संवादात सांगितले की,"भारत कोणत्याही मुद्द्यावर पळवाटा शोधत नाही तर त्यावर योग्य निर्णय घेण्यावर विश्वास ठेवतो. जयशंकर यांचे विधान अशा वेळी आले आहे. जेव्हा अनेक देशांनी इंडो-पॅसिफिकमध्ये भारताच्या भूमिकेवर आव्हान निर्माण केले आहे.'रायसीना संवाद'ला संबोधित करताना जयशंकर यांनी अमेरिका-इराण यांच्यात सुरू असलेल्या तणावावर बोलताना ते म्हणाले,"अमेरिका आणि इराण हे दोन भिन्न देश आहेत आणि आता पुढे काय होईल हे त्यांच्या अंतर्गत पक्षांवर अवलंबून आहे." चीनशी असलेल्या संबंधांबद्दल परराष्ट्रमंत्री म्हणाले की,"शेजारच्या देशांनी महत्त्वाच्या मुद्द्यांवर सहमती देणे आवश्यक आहे."



पुढे जयशंकर म्हणाले की
,"भारत दहशतवादविरोधी कठोर भूमिका घेत आहे. भारताला आपल्या जुन्या प्रतिमेतून बाहेर पडण्याची गरज आहे. एक काळ असा होता की आम्ही काम कमी आणि बोलत जास्ती होतो पण आता ही परिस्थिती बदलत आहे.



रायसीना संवादाचे पाचवे सत्र परराष्ट्र मंत्रालय आणि ऑब्झर्व्हर रिसर्च फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केली गेले. शंभरहून अधिक देशांचे ७००आंतरराष्ट्रीय भागीदार यात सहभाग घेत आहेत. ही देशातील सर्वात मोठी परिषद आहे. मंगळवारी सुरू झालेल्या या तीन दिवसीय परिषदेत १२ परराष्ट्र मंत्री सहभागी होत आहेत. यामध्ये रशिया
, इराण, ऑस्ट्रेलिया, मालदीव, दक्षिण आफ्रिका, एस्टोनिया, झेक प्रजासत्ताक, डेन्मार्क, हंगेरी, लाटविया, उझबेकिस्तान आणि ईयूच्या परराष्ट्र मंत्र्यांचा समावेश आहे. इराणचे परराष्ट्रमंत्री जावेद जरीफ यांचा सहभाग महत्त्वपूर्ण आहे. कारण तो इराणच्या कुड्स फोर्सचा कमांडर कासिम सुलेमानीच्या हत्येनंतर पहिल्यांदाच ते आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर येत आहेत.

@@AUTHORINFO_V1@@