पवारसाहेब आत्ता बोला ! रामदास स्वामी स्मारकाचा फोटो व्हायरल

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Jan-2020
Total Views |
Sharad Pawar _1 &nbs


शरद पवारांनी केवळ जातीय राजकारण केले : भाजप 

 

मुंबई :  समर्थ रामदास स्वामी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त विधान करणाऱ्या शदर पवारांना एका फोटोद्वारे प्रश्न विचारण्यात येत आहे. तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी उद्घाटन केलेल्या स्मारकाच्या कोनशीलेचा एक फोटो सध्या व्हायरल झाला आहे. 'रामदास स्वामी हे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरू नव्हते, शिवरायांच्या काळात समर्थ रामदास नव्हतेच, हा उलगडा छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास वाचल्यानंतर होईल, असे वादग्रस्त विधान करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर देशभरातून टीका केली जात आहे. पवारांनी जातीयवादाचे राजकारण करणे आतातरी थांबवावे, अशा प्रतिक्रीया त्यांच्या वक्तव्यावर उमटत आहेत. याच वेळी शरद पवार यांनी २६ एप्रिल १९९० रोजी अनावरण केलेल्या स्मारकाचा फोटो व्हायरल होत आहे. जर समर्थ रामदास स्वामी हे शिवरायांचे गुरू नव्हते या विचाराचे तुम्ही आहात तर मुख्यमंत्री असताना या पुतळ्याचे अनावरण करणारे पवार कुठले होते, असा सवाल विचारला जात आहे. 


नेमकं काय म्हणाले होते पवार ?

शरद पवार यांना 'जाणता राजा' ही उपाधी देण्याबद्दल भाजपने आक्षेप घेतला होता. यावर बुधवारी दुपारी सातारा येथे एका कार्यक्रमानिमित्त त्यांनी आपली प्रतिक्रीया दिली. पवार म्हणाले, "'जाणता राजा' मला म्हणावं, असा माझा अट्टाहास नाही. मात्र, मी एक गोष्ट सांगू इच्छितो की छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहास नीट अभ्यासला केला तर ज्ञात होईल की, छत्रपती यांची उपाधी 'शिवछत्रपती' ही होती, 'जाणता राजा' अशी कधीच नव्हती. 'जाणता राजा' हे बिरुद रामदास स्वामींनी शिवरायांना दिले आणि मी हेही सांगतो की रामदास स्वामी हे शिवाजी महाराजांचे गुरु नव्हते, तर त्यांच्या गुरु राजमाता जिजाऊ होत्या. शिवरायांचं व्यक्तिमत्त्व जिजाऊंनी घडवलं आहे,' असे विधान राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले. त्यांच्या वक्तव्यानंतर राज्यातून संतप्त प्रतिक्रीया उमटू लागल्या आहेत.


पवारांनी राजकारण करताना केवळ जातमध्ये आणली : चंद्रकांतदादा पाटील

"प्रत्येकवेळी शरद पवार हे जातीय राजकारण करण्याचा प्रयत्न करतात. आम्ही जेव्हा संभाजीराजेंना खासदारकी देऊ केली त्यावेळी आता पेशवे महाराजांना खासदार करणार का, असा सवाल विचारला होता. प्रत्येकवेळी जातीचा आधार घेऊन पवारांनी राजकारण केले," असा आरोप भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी केला आहे.



@@AUTHORINFO_V1@@