कादवणमध्ये शतक महोत्सवी हरिनाम सप्ताह

    15-Jan-2020
Total Views |
MandanGad _1  H
 


मंडणगड : मंडणगड तालुक्‍यातील कादवण येथे १७ ते २१ जानेवारी या कालावधीत शतक महोत्सवी अखंड हरिनाम सप्ताह सोहळा संपन्न होणार आहे. यावेळी सामुदायिक ज्ञानेश्‍वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताहामध्ये पंचक्रोशिमधील भाविक सहभागी होत असतात.

 

हा नामस्मरण सोहळा स्वानंद सुखनिवासी अलिबागकर बाबा गुरुवर्य गोपाळ बाबा वाजे आणि स्‍वानंद सुखनिवासी गुरुवर्य काशिनाथ बाबा महाराज यांच्‍या आर्शिवादाने गुरुवर्य हभप. नारायण दादा वाजे मठाधिकारी क्षेत्र पंढरपूर यांच्‍या मार्गदर्शनाखाली होत आहे. त्यानिमित्त सकाळपासून रात्रीपर्यंत विविध कार्यक्रम होणार आहेत. तसेच भाविकांना महाप्रसादाचा लाभ घेता येणार आहे.

 

तसेच, १८ ते २० जानेवारी या कालावधीत बजरंग बली क्रिकेट संघ कादवणतर्फे भव्य क्रिकेट आयोजन करण्यात आले आहे. २० जानेवारीला सायंकाळी चार ते पाच या वेळेत हळदीकुंकू समारंभ होईल. २१ जानेवारीला काल्‍याचे किर्तन आणि दुपारी महाप्रसाद असेल. सर्व भाविकांनी या सप्ताहाचा लाभ घ्यावा, असे आवाहन कादवण ग्रामस्थाकडून करण्यात आला आहे.

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.