रावण जामिनावर, दिल्लीबाहेर राहण्याचे कोर्टाचे आदेश

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Jan-2020
Total Views |

Ravan _1  H x W



आठवड्याला हजेरी लावावी लागणार



नवी दिल्ली : दिल्ली न्यायालयाने भीम आर्मी प्रमुख चंद्रशेखरला सशर्त जामीन मंजूर केला आहे. बुधवारी झालेल्या जामीनावरील सुनावणीत चार आठवडे दिल्लीबाहेर राहण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. याशिवाय सहारनपूर ठाण्यात दर आठवड्याला हजेरी लावण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत. दिल्लीतील शाहीनबागेत न जाण्याची अटही यावेळी घालण्यात आली आहे.


भीम आर्मी प्रमुख चंद्रशेखर आझाद रावण याला नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाला विरोध करणाऱ्या जमावात हिंसाचार झाल्याप्रकरणी अटक झाली होती. यावेळी झालेल्या आंदोलनात मोठ्या प्रमाणावर हिंसाचार झाला होता. १५ डिसेंबरपासून नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाविरोधात प्रदर्शन केले जात आहे. दिल्लीतील जामा मशीद आणि शाहीनबाग येथे दररोज होणाऱ्या निदर्शनामुळे रहदारीत अडथळे येत आहेत. त्यामुळे जनजीवन विस्कळीत होत आहेत.




@@AUTHORINFO_V1@@