हिजबुल कमांडर हारुण हाफज सैन्य चकमकीत ठार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Jan-2020
Total Views |


RSS_1  H x W: 0



जम्मू काश्मीर : जम्मू-काश्मीरमध्ये भारतीय सैन्याने डोडा येथे झालेल्या चकमकीत हिजबुल मुजाहिद्दीचा कमांडर हारुण हाफज याला ठार करण्यात आले. हारुण हाफज याने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक चंद्रकांत शर्मा व त्यांच्या सुरक्षारक्षाकसह किश्तवाड येथील परिहार बंधुंचा हल्लेखोर होता. ९ एप्रिल २०१९ रोजी किश्तवाड जिल्हा रुग्णालयाच्या मुख्य गेटजवळ हल्लेखोरांनी दोघांना गोळ्या घातल्या होत्या. रा.स्व. संघाचे स्वयंसेवक चंद्रकांत शर्मा यांना जम्मूच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नेण्यात आले व तेथेच त्यांचा मृत्यू झाला.



अनेक दिवसांपासून हारुण हफाजचा शोध सुरू होता. पोलिसांनी त्याच्यावर तब्बल १५ लाख रुपायांचा इनाम देखील ठेवलेला होता. या कारवाईनंतर परिसरात अन्य देखील दहशतवादी लपून बसलेले असल्याची शक्यता असल्याने
, जवानांकडून संपूर्ण परिसरात शोध मोहीम राबलवी जात आहे. काही दिवसांवर प्रजासत्ताक दिन आलेला असताना दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने तीन संशयीत दहशतवाद्यांना देखील ताब्यात घेतलेले आहे. ख्वाजा मोइद्दीन, अब्दुल समद आणि सय्यद अली नवाज अशी त्यांची नावं असल्याचे समोर आले आहे. दिल्ली-एनआरसी किंवा उत्तर प्रदेशमध्ये दहशतवादी हल्ला घडवण्याचा ते कट रचत असल्याची माहिती समोर आली आहे.

@@AUTHORINFO_V1@@