
‘गंगुबाई काठीयावाडी’चे पहिले पोस्टर प्रदर्शित
मुंबई : अभिनेत्री आलिया भट्टची प्रसिद्धी दिवसागणिक वाढताना दिसत आहे. प्रत्येक चित्रपटांमध्ये वेगळ्या धाटणीच्या भूमिकेत झळकणारी आलिया पुन्हा एकादा नवी आणि तितकीच वेगळी व्यक्तिरेखा साकारताना दिसणार आहे. दिग्दर्शक संजय लिला भंसाळी यांच्या ‘गंगुबाई काठीयावाडी’ चित्रपटात ती मुख्य भूमिकेत झळकणार आहे. कामाठीपुऱ्यामधील विशेष चर्चिल्या गेलेल्या गंगुबाई यांच्या जीवनावर चित्रपटाच्या माध्यमातून प्रकाशझोत टाकण्यात येणार आहे.
Strength. Power. Fear!
— BhansaliProductions (@bhansali_produc) January 15, 2020
One look, a thousand emotions. Presenting the first look of #GangubaiKathiawadi. In cinemas 11 September 2020.@aliaa08 #SanjayLeelaBhansali @prerna982 @jayantilalgada @PenMovies pic.twitter.com/CUSs5TDEBQ