गेल्या ४८ तासात ६ जवान हुतात्मा... महाराष्ट्राचे सुरेश चित्ते शहीद

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Jan-2020
Total Views |


saf_1  H x W: 0


नवी दिल्ली : गेल्या ४८ तासांमध्ये भारतीय लष्कराचे ५ तर बीएसएफचा १ जवान जम्मू काश्मीरमध्ये हिमस्खलनात शहीद झाले आहेत. मध्य आणि उत्तर काश्मीरच्या विविध घटनात १० जणांचा बळी गेला आहे. त्यामध्ये ५ जण लष्कराचे जवान आहेत. तर १ बीएसएफ जवान आहे. वार्षिक आर्मी परेड दिन २०२०निमित्त भारतीय लष्कर प्रमुख मनोज नरवणे यांनी वाहिली या शहिदांना श्रद्धांजली वाहिली.

 

मछील सेक्टरवर फॉर्वर्ड पोस्टवर हिमस्खलनात लष्कराचे ४ जवान बर्फाखाली अडकले. त्यामधील एकाला वाचवण्यात यश आले होते. गुरेश आणि रामपूर सेक्टरमध्येही हिमस्खलन झाले होते. तसेच, नौगाम सेक्टरमध्ये झालेल्या हिमस्खलनात १ बीएसएफ जवान शहीद झाले. गंधरबाल जिल्ह्यात झालेल्या हिमस्खलनात ५ नागरिक ठार झाले आहेत.

 

लातूरचे पुत्र सुरेश चित्ते शहीद

 

सियाचीन येथे तैनात असलेले जवान सुरेश चित्ते शहीद झाले. ते मुळचे लातूर जिल्ह्यातील औसा तालुकाच्या आलमचे सुपुत्र आहेत. ऑक्सिजन पुरवठा न झाल्यामुळे सियाचीनमध्ये कर्तव्य बजावत असताना चित्ते यांना वीरमरण आले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, आई आणि एक लहान भाऊ आहे.

@@AUTHORINFO_V1@@